Gadchiroli Crime News : गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात जन्मदात्या बापालाच लेकानं संपवलं असून हत्येनंतर मित्राच्या मदतीने मृतदेह ही जंगलात फेकून (Crime News) दिलाय. मात्र भीतीने हादरलेल्या मुलाने नंतर नदीत उडी घेतली. मात्र, सुदैवाने तो त्यात बचावला. कालांतराने पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर अखेर मुलानेच वडिलांच्या हत्येची कबुली दिली आहे. मात्र, या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, जन्मदात्या वडिलांची हत्या करून पोटच्या मुलाने मित्राच्या मदतीने मृतदेह जंगलात फेकला. त्यानंतर वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. मात्र 15 दिवसांनी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली, त्यामुळे भंडाफोड होण्याच्या भीतीने हादरलेल्या मुलाने नदीत उडी घेतली. मात्र, सुदैवाने तो वाचला. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर अखेर मुलानेच वडिलांच्या हत्येची कबुली दिली आहे. ही खळबळजनक घटना चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे घडली असून या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात घटनेचा उलगडा झाला असून पोलिसांनी मुलासह त्याच्या मित्रालाही अटक केली आहे. रेवनाथ कोडापे (रा. मार्कंडादेव) असे वडिलाचे तर आकाश रेवनाथ कोडापे (वय 29) असे आरोपी मुलाचे आणि लखन मडावी मित्राचे नाव आहे.
रेवनाथ हे मार्कंडादेव येथील देवस्थानच्या यात्री निवासमध्ये मजुरी काम करायचे. मुलगा आकाश हा देखील मजुरीकाम करायचा. पिता-पुत्रांमध्ये सतत वाद होत. वडील सतत शिवीगाळ करतात, त्यामुळे आकाशच्या मनात राग होता. त्यातच आकाशने पैसे मागितल्यामुळे वडिलांसोबत त्याचा वाद झाला होता. 15 एप्रिल रोजी पिता-पुत्रातील वाद विकोपाला गेला. या वादात मुलगा आकाशने ओढणीने गळा आवळून वडीलांची हत्या केली. त्यानंतर मित्र लखन मडावीला जीप घेऊन बोलावले. दोघांनी मृतदेह गाडीत टाकून बामनपेठ जंगलात फेकून दिला. दुसर्या दिवशी आकाशने वडील बेपत्ता असल्याची तक्रार चामोर्शी ठाण्यात दिली होती. आता या प्रकरणाचा छडा लागला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.