मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईत संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त 1 मे ते 4 मे या कालावधीत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवामध्ये आज राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवललेल्या नेत्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमाजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे, माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते. या सोहळ्यात नारायण राणे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्याचा ६५ वा वर्धापन दिन साजरा केला. त्यांनी उचललेल्या पावला बाबत त्यांच अभिनंदन करतो, असं खासदार नारायण राणे म्हणाले. एका चांगल्या उपक्रमाला आपण एकत्र येत नाही याला काय अर्थ आहे? नुसते कार्यक्रम करणं, भाषण करण म्हणजे सगळं झालं असं नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळी वेळी 52 टक्के मराठी माणूस मुंबईत होता आता 22 टक्के राहिला आहे. ही अधोगती लक्षात घ्यायला हवी. मराठी माणूस गेला कुठे हे पाहायला हवं, असं नारायण राणे म्हणाले.
कर्नाटक दरडोई उत्पनात आपल्या पुढे आहे. आपण यामध्ये पुढं आलं पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक अर्थव्यवस्थेत देश तिसऱ्या क्रमांकर येणार असं म्हणतात तो येईल ही मग यात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर असेल हे पाहणं गरजेचं आहे, असं नारायण राणेंनी म्हटलं.
आधी सर्वपेक्षीय बैठक व्हायची राज्याच्या देशाच्या विकासाचे मुद्दे चर्चेला यायचे आता मात्र होतं नाही. अजित पवारांनी सर्वांना निमंत्रण दिलं मात्र लोकं आली नाहीत. एकत्रित येण्यासाठी हाक द्या नाही आले तर सोडून द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत. केवळ भाषण करण योग्य नाही. कृतीतून सगळं दिसायला हवं, असंही नारायण राणेंनी म्हटलं. या कार्यक्रमाला परदेशातून येण गरजेचे होतं मात्र त्यांना परतीच तिकिट मिळालं नाही. सुनील तटकरे यांनी काय मॅनेज केलं माहिती नाही. आज मी शिवसेनेमुळे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालो. एक दिवस मला बाळासाहेब ठाकरेंनी बोलावलं मी गेलो ते मला म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद चालवशील का? मी माझ्या स्वभावानुसार बोललो साहेब मुख्यमंत्री पद पळवेल. बाळासाहेब ठाकरेंनी सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला मुख्यमत्री केलं, असं नारायण राणे म्हणाले. मराठी माणूस महाराष्ट्रात मागं याचं आत्मपरीक्षण करावं लागेल, असं नारायण राणे म्हणाले.
मुख्यमंत्र्याचा दरारा काय असू शकतो हे मी नारायण राणे यांच्या रूपाने पाहिलं आहे. विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा मी पाहिलं नारायण राणे यांनी सभागृहात नुसतं मागे पाहिलं तरी सगळे शिवसेना आमदार चिडीचूप होऊन जायचे, असं अजित पवार म्हणाले.
अधिक पाहा..
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.