देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीत 18643 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मात्र, 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 20698 कोटी रुपये होता.

स्टेट बँक ऑफ इंडियाला तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा 16891 कोटी रुपये नफा झाला होता. चौथ्या तिमाहीत 10.4 टक्के वाढ होऊन 18643 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार करता स्टेट बँक ऑफ इंडियानं 2024-25 या आर्थिक वर्षात 70901 कोटी रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. वार्षिक आधारावर ही वाढ 16.08 टक्के इतकी आहे. बँकेनं या आर्थिक वर्षासाठी 15.90 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. गेल्या वर्षी बँकेनं शेअरधारकांना 13.70 रुपये प्रति शेअर लाभांश दिला होता.

मार्च च्या तिमाहीत बँकेल निव्वळ व्याज उत्पन्न  वार्षिक आधारावर 2.69 टक्क्यांच्या वाढीसह 42775 कोटी रुपये इतकं मिळालं.बँकेचं या तिमाहीतील इतर उत्पन्न वाढल्याचं पाहायला मिळालं. कमिशन, कोषागार उत्पन्न, शुल्क यातून 24210 कोटींचं उत्पन्न बँकेला मिळालं.

कॉस्ट -इनकम गुणोत्तर देखील सुधारलं असून 31 मार्च 2025 पर्यंत ते 51.64 टक्के इतकं होतं. जे गेल्या वर्षी  55.66 टक्के इतकं होतं. 31 मार्च 2025 पर्यंत बँकेचं वार्षिक आधारावर 12.03 टक्क्यांनी वाढून 42 लाख कोटी रुपये झालंय. बँकेकडील रिटेल पर्सनल लोन, कॉरपोरेट लोनमध्ये देखील वाढ झालीय.सर्वात वाढ ह कर्जात झाली आहे. जी 14.46 टक्के आहे.

स्टेट बँकेकडील ठेवी वार्षिक 9.48 टक्क्यांनी वाढून 53.8 लाख कोटी रुपये झालीय. बँकेचा ग्रॉस एनपीए घटला असून 1.82 टक्के राहिला आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

येथे प्रकाशितः 03 मे 2025 10:31 दुपारी (आयएसटी)

\

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..

Contact to : xlf550402@gmail.com

Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.