नागपूर :  भारतात डिजीटल पेमेंटस अ‍ॅपद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले जातात. जवळपास सर्वच व्यवहारांमध्ये मध्ये ऑनलाईन पेमेंटचा वापर केला जातोय. मात्र, वाढत्या ऑनलाईन पेमेंटसच्या संख्येप्रमाणं आर्थिक फसवणूक करण्याची प्रकरण देखील वाढली आहेत. सायबर गुन्हेगारांकडून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांच्या कृत्यांचा फटका पेट्रोल पंप चालकांना बसत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननं मोठा निर्णय घेतला आहे. 10 मे पासून कोणत्याही प्रकारचं डिजीटल पेमेंट स्वीकारायचं नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. 


डिजीटल पेमेंट न स्वीकारण्याचं कारण काय? 


नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शनिवार 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील रक्कम गोठवली जात असल्याने विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत देशभरात डिजीटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात काही. बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे.


सायबर फसवणुकीच्या काही प्रकरणांमुळे तर संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आली आहेत. संबंधित खात्यांतील रक्कम गृहमंत्रालयाच्या आदेशाशिवाय परत मिळवता येत नाही. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून, सायबर क्राइम विभागाकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या समस्येचे लवकरात लवकर समाधान झाले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल पेमेंट बंद करण्याचा विचार संघटना करत आहे.


विदर्भ पेट्रोल पंप असोसिएशनने डिजिटल पेमेंट बंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचा ग्राहकांवर परिणाम होणार हे निश्चित आहे. डिजिटल इंडियासाठी आग्रही असलेल्या सरकारकडून या निर्णयासंबंधी कोणती भूमिका घेतली जाते हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे.


ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ 


भारतात गेल्या काही वर्षांमध्ये डिजीटल पेमेंटच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर विविध कारणं सांगून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. बँक खात्याची केवायसी करण्याच्या नावाखाली APK फाईल पाठवून मोबाईलचा ताबा घेतला जातो. याशिवाय पीएम किसानच्या नावावानं APK फाईल पाठवून स्मार्ट फोन हॅक केले जातात. सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणूक करुन ती रक्कम अनेक खात्यांमध्ये पाठवले जातात. त्यामळं ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नये म्हणून नागरिकांनी बँक खात्याची माहिती, एटीएम पिन, ओटीपी, ई केवायसी यासंदर्भातील माहिती शेअर करु नये.  

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.