मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची संधी न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे हे आपली नाराजी अधूनमधून बोलून दाखवत असतात. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही मुख्यमंत्री बनण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. अनेकदा त्यांनी याबाबत जाहीर भाष्य केलं आहे. मुंबईत शुक्रवारी (2 मे) एका कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Jayant Patil’s reaction to Ajit Pawar’s desire to become Chief Minister)
छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांना अजित पवारांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या इच्छेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, ज्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र सध्या तरी मुख्यमंत्री होणं पुढील पाच वर्षे शक्य नाही. पण तरीही ते मुख्यमंत्री झालेच तर आम्हाला आनंद आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी एकप्रकारे अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा – Ajit Pawar : कर्जमाफीच्या प्रश्नावर अजितदादा भडकले; पत्रकारालाच म्हणाले, तू उद्या मुख्यमंत्री झाला तरी…
अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील भेटीगाठी व दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेसंदर्भात जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेची एक बैठक झाली होती. परंतु या बैठकीला राजकीय अर्थ देण्यात काहीही अर्थ नाही. तसेच घरात एखादा कार्यक्रम झाला असेल तर तो घरगुती कार्यक्रम आहे. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीचे राजकीय अर्थ काढू नयेत, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील एका कार्यक्रमात एका वक्त्याने राज्यात मुख्यमंत्रिपदी महिला विराजमान व्हायला पाहिजे, अशी आशा व्यक्त केली होती. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणाल्या होत्या की, भविष्यात या महाराष्ट्रात एखादी महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं. पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो. कारण मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय” असे मिश्कील वक्तव्य अजित पवार केलं होतं.
हेही वाचा – Politics : अजित पवार गटात जाण्याचा दावा? सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया ट्विटरवर भिडल्या
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.