ठाणे : मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे येथे (Murbad Jambhurde Murder) भालचंद्र बिऱ्हाडे (वय 52) या व्यक्तीची पूर्ववैमनस्यातून गावातीलच तरूणाने भर चौकात सर्वांसमक्ष कुऱ्हाडीने अमानुषपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. गणेश भोपी असं आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जाभुंर्डे गावाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले
मुरबाड तालुक्यातील जांभुर्डे गावातील भालचंद्र बिऱ्हाडे आणि गणेश भोपी यांच्यात पूर्वीपासून वैर होतं. शनिवारी भालचंद्र बिऱ्हाडे हा आपले घरातून बाहेर पडत असताना गावाच्या चौकात असलेल्या रिक्षा स्टँडवर दबा धरून बसलेला गणेश याने त्याच्या डोक्यावर आणि अंगावर धारदार कुऱ्हाडीने घाव घातला. यामध्ये भालचंद्र बिऱ्हाडेचा मृत्यू झाला.
हा प्रकार एवढा भयानक होता की हल्ला करणाऱ्या गणेशला आवरायला कुणीही पुढे आले नाही. अखेर लोकांचा जमाव जमताच गणेशने त्या ठिकाणाहून पळ काढला. ही घटना मुरबाड पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गणेशला शोधण्यासाठी परिसर पिंजून काढला. पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान, गणेशच्या सोबतीला कोण कोण होते, या प्रकरणात अन्य कुणाचा सहभाग आहे, तसेच भालचंद्र आणि गणेशचा वाद कशामुळे विकोपाला गेला याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश शिंदे, पोलिस निरीक्षक संदिप गिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव खोमणे हे करत आहेत.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.