बेळगाव : रायबाग तालुक्यातील मेखळी गावच्या राम मंदिर मठाच्या लोकेश्वर स्वामीला (Lokeshwar Swami Belgaum) पोलिसांनी अटक केली आहे. बेळगावातील पीयूसी (Belgaum PU College) म्हणजे अकरावीत शिकणाऱ्या एका मुलीवर तीन दिवस अत्याचार केल्यामुळे स्वामीला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. या स्वामीमुळे गावची बदनामी झाली असून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मेखळी ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकरणी मुडलगी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी स्वामीला अटक करून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे. या घटनेमुळे मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
पीडित मुलगी आणि तिचे वडील हे आश्रमाचे भक्त होते. गेल्या दोन वर्षांपासून ते आश्रमाला नियमित जात होते. पीडित मुलगी कानट्टी या तिच्या मामाच्या गावाला जाऊन गावी परत येत होती. त्यावेळी कारमधून जाणाऱ्या लोकेश्वर स्वामीने तिला घरी सोडतो असं सांगत सोबत घेतलं.
त्या मुलीला कारमध्ये घेतल्यानंतर तिला तिच्या घरी न सोडता लोकेश्वर स्वामीने तिला धमकावले आणि रायचूर येथे लॉजवर नेऊन दोन दिवस अत्याचार केले. नंतर बागलकोट येथे नेऊन लॉजवर एक दिवस अत्याचार करून तिला महालिंगपूर गावात सोडले. घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितलं तर तुला मारून टाकेन अशी धमकी देखील स्वामीने त्या मुलीला दिली होती.
घरी परतलेल्या त्या मुलीने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ लोकेश्वर स्वामीला बेड्या ठोकल्या आणि मठाची झडती घेतली.
स्वामीला अटक झाली त्यावेळी मेकळी गावातील राम मंदिर मठात तलवार, कोयता, जांबिया अशी हत्यारे सापडली. लोकेश्वर स्वामी मटक्याचे नंबर तसेच जुगाराशी संबंधीत भक्तांना माहिती द्यायचा. त्यामुळे मटक्याच्या माध्यमातून नशीब आजमवण्यासाठी केवळ बेळगावच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेक लोक स्वामीकडे यायचे.
स्वामीच्या या कारनाम्याबद्दल मेखळी ग्रामस्थानी अनेकदा पोलिसांना माहिती दिली होती. पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करत कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी, एका निष्पाप गरीब मुलीला स्वामीने त्याच्या वासनेची शिकार बनवले. स्वामीमुळे आमच्या गावाचे नाव बदनाम झाले असून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मेखळी ग्रामस्थानी केली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.