आज मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरची ओळख आहे. ब्युटीफुल अभिनेत्री सई हिचा वाढदिवस. सईनं आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. परंतु सईच्या करिअरच्या सुरुवातीचा काळ फार कठीण आणि प्रेरणादायी होता.


सईने अभिनयाची सुरुवात टेलिव्हिजनवरील गोजिरवाण्या घरात या मालिकेतून केली. त्यानंतर तिने ती जी पुढे गेली ते तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सईने मराठीसह हिंदी सिनेमातही आपला ठसा उमटवत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.


करिअरच्या सुरुवातीला सई मुंबईत पीजीमध्ये राहात होती. स्ट्रगल काळात ती अनेक ठिकाणी राहिली आणि 10 वेळा घरं बदलली. अखेर 2023 मध्ये तिनं तिचं 'स्वप्नातलं घर' मुंबईत विकत घेतलं. हा प्रवास तिनं तिच्या ब्लॉगमध्येही शेअर केला होता.





View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)






2013 मध्ये सईनं अमेय गोसावी याच्यासोबत विवाह केला होता, परंतु त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. अवघ्या दोन वर्षांत दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सई निर्माता अनिश जोग याला डेट करत होती. परंतु सध्या तिच्या अनिशसोबत ब्रेकअपच्या चर्चा सुरुये.


सई ताम्हणकर केवळ अभिनयातच नाही, तर फॅशनच्या दुनियेतही सर्वांत अग्रेसर आहे. पारंपरिक कपड्यापासून ते वेस्टर्न कपड्यांपर्यंत प्रत्येक लूकमध्ये सई सगळ्यात वेगळी असते. तिच्या बिनधास्त बोलण्याची शैली आणि आत्मविश्वास तरुणींसाठी प्रेरणा ठरतोय.

SIDDHU WEDS BHAVANA: प्रत्येक पावलावर सिद्धू देणार भावनाची साथ, सप्तपदीने सुरू होणार नव्या संसाराचा प्रवास! प्रेक्षक म्हणाले, 'खूप छान...'

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.