Reuters
दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या इस्रायल-इराण संघर्षात उडी घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा जुगार खेळला आहे. पण सध्यातरी अमेरिकेला याचा फायदा होताना दिसतोय.
सोमवारी संध्याकाळी ट्रम्प यांनी घोषणा केली की दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दाखवली आहे आणि यामुळे कायमस्वरूपी शांतता निर्माण होऊ शकते असं ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघर्षाला '12 दिवसांचं युद्ध' असं नाव दिलं होतं आणि आता जर का त्यांनी हे युद्ध खरोखर थांबवलं असेल तर हे एक महत्त्वाचं पाऊल ठरेल.
विशेषतः हे युद्ध आता या संपूर्ण प्रदेशात पसरेल आणि अमेरिकेने इराणच्या आण्विक ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांनंतर अमेरिका देखील यात खेचली जाईल असं वाटत असताना हे युद्ध थांबलं तर ती एक अत्यंत महत्त्वाची घटना असेल.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "इस्रायलने तेहरानच्या वेळेनुसार पहाटे 4 पर्यंत इराणविरुद्ध केली जाणारी बेकायदेशीर कारवाई थांबवली तर आम्ही देखील त्यानंतर काही करणार नाही."
इराणच्या मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनानंतर इस्रायल सरकारने देखील 'ठरलेलं लक्ष्य' गाठल्यानंतर आम्ही इराणवरचे हल्ले थांबवण्याचा प्रस्ताव स्वीकारल्याचं म्हटलं आहे.
इराणने दिलेली पहाटे 4 पर्यंतची मुदत जवळ आल्यानंतर दोन्ही देशांनी तणाव कमी केल्याचं चित्र आहे. इस्रायलचे हल्ले देखील थांबले आहेत.
दोन तासांनीच शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे आरोपया कराराच्या केवळ दोनच तासांनंतर इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इराणवर युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचे आरोप केले. तसेच इस्रायल प्रत्युत्तर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. इराणने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
ट्रम्प प्रशासन अशी अपेक्षा करत असेल की युद्धबंदीच्या उल्लंघनाचे आरोप हे केवळ एक अपवाद असतील आणि दोन्ही देश या युद्धबंदीच्या निर्णयाचा आदर करतील.
शनिवारी (21 जून) अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणने हल्ले केले. यामुळे संपूर्ण दिवसभर या प्रदेशात गोंधळाची परिस्थिती होती आणि त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली आहे.
इराणच्या हल्ल्यांबाबत सुरुवातीला आलेल्या वृत्तानुसार कतारमधील अमेरिकेच्या विशाल तळाच्या दिशेने इराणने डागलेली सर्व क्षेपणास्त्रं रोखण्यात आली आणि त्यात कसलीही अमेरिकन जीवितहानी किंवा नुकसान झालं नाही.
ट्रम्प यांचे राष्ट्राला संबोधनशनिवारी रात्री राष्ट्राला संबोधित करताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इशारा दिला होता की अमेरिकेचे हितसंबंध असणाऱ्या ठिकाणांवर इराणच्या कोणत्याही हल्ल्याला अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. गरज पडल्यास अमेरिकन सैन्याकडून आणखी काही लक्ष्यांवर हल्ला केला जाऊ शकतो असंही ते म्हणाले होते.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संपूर्ण जग इराणच्या प्रतिसादाची 24 तासांपेक्षा जास्त काळ वाट बघत होतं. इराणने अखेर कारवाई केली आणि संपूर्ण जगाचं लक्ष पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे गेलं. त्यानंतर काही तासांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करून लिहिलं की, "आम्ही इराणच्या आण्विक ठिकाणांवर जे हल्ले केले होते त्याला इराणने अतिशय कमकुवत हल्ले करून अपेक्षित प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही अत्यंत यशस्वीपणे या हल्ल्याला परतावून लावलं आहे."
ट्रम्प म्हणाले की, "इराणने त्यांच्याकडची सगळी ताकद वापरून झाली आहे आणि आता इराण त्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याकडे वाटचाल करू शकतो."
इराणने केलेल्या हल्ल्यात अमेरिकेच्या तळांचं मर्यादित नुकसान झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यांना ट्रम्प यांनी प्रत्युत्तर देणं टाळलं असं वाटतंय कारण त्यांना अशी अपेक्षा होती की इराण आता प्रामाणिकपणे वाटाघाटी करण्यास तयार असेल. आणि व्हाईट हाऊसने असं सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प पडद्यामागून कतारचे मध्यस्थ आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी युद्धबंदीबाबत चर्चा करत होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या आठवड्यात इराणवर केलेले हल्ले ही मोठी जोखीम होती पण अखेर आता त्या जोखमीचे फायदे मिळताना दिसत आहेत.
इराणचे प्रत्युत्तर2020च्या जानेवारी महिन्यातसुद्धा अशीच परिस्थिती तयार झाली होती. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी बगदादमध्ये इराणी रिव्होल्यूशनरी गार्डचे नेते कासिम सुलेमानी यांच्या हत्येचे आदेश दिले होते.
इराणने इराकमधील लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे 100 हून अधिक अमेरिकन सैनिक जखमी झाले, परंतु अमेरिकेने यावर पुढे कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. शेवटी शांत राहून राबवलेली रणनीती यशस्वी झाली.
अमेरिकेच्या माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार अमेरिकेने इराणवर जेवढे बॉम्ब टाकले होते तेवढीच क्षेपणास्त्रं इराणने अमेरिकेच्या तळांवर केलेल्या हल्ल्यात वापरली आहेत.
त्यासोबतच, इराणने हल्ला करण्यापूर्वी कतार सरकारला दिलेल्या आगाऊ सूचनांबद्दल ट्रम्प यांनी ते आभारी असल्याचं म्हटलं होतं. यावरून हे दिसून येतं की इराणला प्रतिसाद तर द्यायचा होता पण हा तणाव वाढवायचा नव्हता.
संपूर्ण दिवसभर डोनाल्ड ट्रम्प यांचं लक्ष तेलांच्या किमती, अमेरिकेच्या माध्यमांमध्ये केलं जाणारं वार्तांकन आणि रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी इराणला बाहेरून इराणला अण्वस्त्रं पुरवण्याच्या केलेल्या सूचनेकडे होतं.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की सध्याचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या आधीच्या राष्ट्राध्यक्षांसारखे नाहीत. त्यांनी एखादी धमकी दिली तर ती प्रत्यक्षात आणली जाते.
इराणने जर पुन्हा एकदा हल्ले केले असते आणि त्यात अमेरिकेचं मोठं नुकसान झालं असतं किंवा एखाद्या अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झाला असता तर ट्रम्प यांच्यावर प्रत्युत्तर देण्याचा दबाव वाढला असता.
सध्या तरी ट्रम्प युद्ध थांबवून दोन्ही देशांमधला तणाव कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि त्यात त्यांना यश मिळताना दिसतंय.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.