Rain Update Kolhapur : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दमदार, तर धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ झाली. काही धरणांतून विसर्गही वाढविण्यात आला. त्यामुळे आज दुपारी बाराच्या सुमारास पहिल्यांदाच पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले. नदीकाठच्या गावांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, आज जिल्ह्यातील ३७ बंधारे पाण्याखाली गेले असून, १३ मार्ग बंद झाले आहेत. जोरदार पावसामुळे उत्तरेश्वर पेठेतील उत्तरेश्वर महादेव मंदिराची संरक्षक भिंत कोसळली. सोमवारी रात्रीपासून आज दिवसभर शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. घटप्रभा धरणासह गगनबावडा तालुक्यातील अणदूर लघु पाटबंधारे तलाव शंभर टक्के भरला.
धरण क्षेत्रासह नदी क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली. या ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव महापालिकेकडून बॅरिकेड लावण्यात आले. पंचगंगेची पाणी पातळी सकाळी २८ फूट सात इंच इतकी होती. ती रात्रीपर्यंत ३१ फुटांवर पोहोचली. सकाळपासून रात्रीपर्यंत पाणी पातळीत जवळपास अडीच फुटांनी वाढ झाली. पंचगंगेची इशारा पातळी ३९, तर धोकापातळी ४३ फूट आहे. दरम्यान, शहरातील रंकाळा तलावाच्या सांडव्याच्या पुलाखालूनही पहिल्यांदाच पाणी वाहू लागले. दरम्यान, जिल्ह्यातील १० कच्च्या घरांची पडझड होऊन तीन लाख १० हजारांचे नुकसान झाले.
Kolhapur : काेल्हापूर जिल्ह्यात ५३ हजार हेक्टरवर पेरण्या; भाताची क्षेत्र सर्वाधिक, मॉन्सूनपूर्व पावसाने पिकांचे नुकसानसर्फनाला धरणक्षेत्रात १९० मिलिमीटर
सर्फनाला धरणक्षेत्रात सर्वाधिक १९० मिलिमीटर पाऊस झाला. त्या खालोखाल पाटगाव धरणक्षेत्रात ११५ मिलिमीटर पाऊस पडला. अन्य धरण, प्रकल्प क्षेत्रातील पाऊस असा (आकडे मिलिमीटरमध्ये) सर्फनाला - १०५, घटप्रभा -१०२, दूधगंगा - ७१, राधानगरी -९३, तुळशी -९७, वारणा-२९, कासारी-७, कडवी-५२, कुंभी-४२, चित्री-६५, चिकोत्रा-२७, जांबरे-२०, आंबेओहोळ-२५. तालुकावार पाऊस असा - गगनबावडा - ९४.३, त्याखालोखाल आजरा- ६८.९, भुदरगड - ६०.१, राधानगरी - ६९.८, भुदरगड - ४०.४, पन्हाळा - ३६.२, शाहूवाडी - ३५.४, कागल - ३३.६, करवीर - २६.७, गडहिंग्लज - २४.६, हातकणंगले - ६.७, शिरोळ - ३.
अनुक्रमे धरणातून विसर्ग आणि पाणीसाठा
घटप्रभा - ५९३४ (भरले), राधानगरी - ३१०० (६४.१३), वारणा - १७२० (६०.३९), दुधगंगा - १६०० (३७.४७), धामणी - ११७६ (६५.३०), तुळशी - ३०० (५६.५१), कासारी - २५० (४४.१),कडवी- २२० (५९.०३),कुंभी -३०० (५८.७४),जांबरे-२३० (९३.८४),सर्फनाला १५३, पाटगाव- ६३.८३, चिकोत्रा - ५०, चित्री - ५९.८९, आंबेओहोळ - ८४.२५, सर्फनाला- ७४.३८(आकडे क्युसेक व टक्केवारीत)
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.