सातारा : कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या जलविद्युत प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देतानाच ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यासाठी या पायथा विद्युतगहाचे नियोजन करण्यात आले आहे. यातून एकूण ८० मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे.
जुन्नर तालुका हादरला! 'जुन्नरमधील कोकण कड्यावरून उडी मारून दोघांनी संपवले जीवन'; रूपालीने मृत्यूपूर्वी लिहीली चिठ्ठी..सुधारित मान्यतेमुळे प्रकल्पाच्या बांधकामाचे काम हाती घेण्यास परवानगी मिळाली आहे. हा प्रकल्प धरणाच्या पायथ्याशी उभारला जाऊन डाव्या तीरावर वीजनिर्मिती केली जाणार आहे. कोयना धरणाच्या मूळ नियोजनात पूर्वेकडील सिंचनासाठी ३० टीएमसी, तर कृष्णा खोरे महामंडळांतर्गत समाविष्ट विविध उपसा सिंचन योजनांसाठी अतिरिक्त २० टीएमसी पाणी देताना त्यातून कमाल मागणीच्या कालावधीत अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.
तसेच धरण पायथ्याची वीजगृहे या कालावधीत रूपांतरित करण्यासाठी कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या योजनेचे नियोजन केले आहे. मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. २०२३ मध्ये शासनाने सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे उदंचन जलविद्युत प्रकल्प, सौर आणि इतर अपारंपरिक संकरित प्रकल्पांच्या विकासाचे धोरण निश्चित केले होते. त्यानुसार आता हा प्रकल्प कृष्णा खोरे महामंडळ व महानिर्मिती कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे.
या जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी आवश्यक एकूण १३३६ कोटी ८८ लाख रुपयांपैकी ८६२ कोटी २९ लाख रुपयांच्या तरतुदीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. उर्वरित खर्चांची तरतूद सिंचन योजनांवर टाकण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे टेंभू, कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना (ताकारी-म्हैसाळ) या योजनांसाठी २० टीएमसी पाणी वीज निर्मितीनंतर सोडले जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे एकूण २७७.८२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होणार आहे.
Success Story: 'अंगणवाडी सेविका ५४ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण'; गोरेवाडीच्या इंदिरा घाडगेंची जिद्द, इच्छाशक्ती प्रबळअतिरिक्त वीजनिर्मितीसाठी निर्णय
८० मेगावॉट वीजनिर्मिती होणार
इतर योजनांना मिळणार
२० टीएमसी पाणी
धरणाच्या डाव्या तीरावर वीजनिर्मिती
कृष्णा खोरे, महानिर्मिती सामंजस्य करार
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.