Ram Kapoor Controversy: गेल्या काही दिवसांपासून वजन कमी केल्यामुळे चर्चेत असलेला टीव्ही अभिनेता राम कपूरने अलीकडेच त्याच्या एका विधानांमुळे मोठा गोंधळ उडवला आहे. तो लवकरच जिओ हॉटस्टारच्या 'मिस्ट्री' सिरीज मोना सिंगसोबत दिसणार असून तो सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.


अलीकडेच, राम कपूरने त्याच्या आगामी 'मिस्ट्री' सिरीजच्या प्रमोशन दरम्यान अशी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत, ज्यामुळे चाहते पूर्णपणे हैराण झाले आहेत. त्याच्या या कृतीमुळे जिओ हॉटस्टारलाही अभिनेत्याविरुद्ध कठोर कारवाई करावी लागली आहे. राम कपूरने त्याची सह-कलाकार मोना सिंगसमोर कोणती वादग्रस्त विधाने केली आहेत याची माहिती घेऊयात

Vineet Kumar Singh: इराण-इस्रायल युद्धादरम्यान दुबई विमानतळावर अडकला होता 'हा' अभिनेता; मंगळवारी सकाळी पोहोचला मुंबईत

कामाची तुलना 'सामूहिक बलात्कार'शी


वृत्तानुसार, बडे अच्छे लगते हैं या फेम अभिनेत्याने गेल्या आठवड्यात प्रमोशन दरम्यान अशी अनेक विधाने केली ज्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या मीडिया टीमला तसेच अनेक लोकांना विचित्र वाटले. एका सूत्राने सांगितले की, त्या दिवशी त्याच्या सलग मुलाखती होत्या. एका क्षणी त्याने त्याच्या कामाच्या दबावाची तुलना 'सामूहिक बलात्कार'शी केली. एका पत्रकाराने माइक सेट करत असताना त्याने अशी अश्लील टिप्पणी केली.

April May 99: 'एप्रिल मे ९९' सलग ३० दिवस चित्रपटगृहांत; चित्रपटाने गाठला यशाचा मोठा टप्पा!



View this post on Instagram

A post shared by JioHotstar (@jiohotstar)






राम कपूरचे बोलणे इथेच थांबले नाही, त्याने त्या संध्याकाळी तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीच्या ड्रेसबद्दल अश्लील टिप्पणी केली आणि जिओ हॉटस्टारच्या पीआर टीमच्या कुटुंबासाठीही अपशब्द वापरले. आतल्या सूत्राने सांगितले की, "त्याने माझ्या सहकाऱ्याचा ड्रेस पाहिला आणि तिच्या कपड्यांची लांबी पाहून तो म्हणाला की हे कपडे खूप विचलित करणारे आहे".


राम कपूर म्हणाला - तू जन्माला यायला नको होतास


अभिनेत्याचा 'मस्करी' करताना त्याने जिओ हॉटस्टार टीमच्या एका पुरुष सदस्याला असेही सांगितले की तुझ्या आईने तुला सांगितले पाहिजे होते की तिला खोटे डोकेदुखी आहे, जेणेकरून तू जन्माला येऊ नये. जिओ हॉटस्टार सूत्राने सांगितले की त्याचा विनोद सेक्सशी संबंधित होता, जे ऐकल्यानंतर उपस्थित लोकांना वाईट वाटले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.