Babanrao Lonikar : भाजपा आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर लोणीकर यांनी भाषणातून आगपाखड केली आहे. कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचे लिहितात. याच कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि  बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केला आहे असे वक्तव्य लोणीकर यांनी केले. तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत असेही लोणीकर म्हणाले. 


नेमकं काय म्हणाले लोणीकर?


कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि  बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केला आहे तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत. तुझ्या अंगावरचे कपडे, आणि  पायातील बुट चप्पल सुद्धा सरकारमुळेच असल्याचे लोणीकर म्हणाले. 
जालना जिल्ह्यातील परतुर येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात बबनराव लोणीकर यांनी टीका केली आहे. 


बबनराव लोणीकरांनी मतदारांनाही दिला होता इशारा


मागील दोन दिवसापूर्वीच भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारांना इशारा देणारं वक्तव्य केलं होतं. जालना तालुक्यातील बोरगावमध्ये लोणीकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या आठ कोटीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच उद्घाटन झालं. यावेळी भाषणात लोणीकरांनी गावकऱ्यानां हा इशारा दिला आहे. विधानसभेत लीड नसल्याने नाराज बबनराव लोणीकर यांनी ग्रामस्थांना कानपिचक्या दिल्या आहेत. जालना तालुक्यातील बोरगावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आठ कोटीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी लोणीकर बोलत होते. 5 वर्षाचे बलुतं, एक फुली द्या नाहीतर नका देऊ. तुम्ही मला नाही दिले तरी पाच दहा कोटी मिळतील हे डोक्यातून काढून टाका असेही लोणीकर म्हणाले. मी एक दोन तीन वेळा पाहिल नंतर गावावर फुली मारील असा इशाराच त्यांनी गावकऱ्यांना दिला.



मी एकदा दोनदा पाहिल, नाहीतर गावावर फुली मारील, भाजप आमदाराचा थेट मतदारांनाच इशारा

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.