दिल्ली, ज्योती नगर : पाचव्या मजल्यावरून एका तरुणीला (Delhi Girl Case) ढकलून दिल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपी तौफिकला उत्तर प्रदेशातील रामपूर येथून अटक करण्यात आली आहे. २३ जून रोजी घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर तो फरार होता. पोलिसांनी (Police) त्याला तांडा (रामपूर) येथून शिताफीने अटक केली.
तौफिकचा कबुलीजबाब : 'तिचे दुसऱ्या कोणाशी संबंध होते'पोलिस चौकशीत तौफिकनं सांगितलं की, तो आणि नेहा (१९ वय) यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून संवाद बंद झाला होता, ज्यामुळे त्याला तिच्यावर दुसऱ्याशी संबंध असल्याचा संशय आला. या शंकेपोटी तो बुरखा घालून तिच्या इमारतीत गेला आणि क्षणभराच्या रागात नेहाला पाचव्या मजल्यावरून ढकललं. ती थेट खाली पडली आणि जागीच मृत्यू पावली.
तलाठी अन् १७ वर्षीय तरुणीनं एकत्र का संपवलं जीवन? दोघांच्या वेगवेगळ्या चिठ्ठ्या; कोकणकड्याजवळ नेमकं काय घडलं? ओळख लपवण्यासाठी बुरख्याचा वापरतौफिकने चौकशीत सांगितले की, 'नेहाच्या घरच्यांना आपली ओळख उघड होऊ नये म्हणून तो बुरखा घालून गेला होता. त्याचा उद्देश होता की कोणीही त्याला ओळखू नये.'
राजाच्या हत्याकांडात धक्कादायक ट्विस्ट; सोनम म्हणाली, 'राज कुशवाहासोबत प्रेमसंबंध होते म्हणून पतीला आयुष्यातून..' प्रेमसंबंध आणि लग्नाचा वादपोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, नेहा आणि तौफिक यांच्यात प्रेमसंबंध (Love Affair) होते. मात्र, तौफिक दुसऱ्या मुलीसोबत लग्न करत असल्याचे नेहाला समजताच दोघांमध्ये तुफान वाद झाला. या वादानंतरच ही दुर्दैवी घटना घडली.
Morning Midas Ship Fire : 3 हजार कारसह जहाज बुडालं, अब्जावधी डाॅलर्सचं नुकसान; 16,400 फूट खोल समुद्रात वाहनांना जलसमाधी कुटुंबाची संतप्त प्रतिक्रिया आणि न्यायाची मागणीनेहाच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'तौफिकने माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलीला छतावरून ढकललं.' कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली असून लोकांनी नेहाला न्याय मिळावा म्हणून निदर्शने सुरू केली आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.