Traditional Kolhapuri Chappals on Milan Runway: कोल्हापुरी चपलांचा इतिहास 12व्या-13व्या शतकात महाराष्ट्रात सुरू झाल्याचं मानलं जातं. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात या चपला अधिक प्रसिद्ध झाल्या. स्थानिक कातडी वापरून, पारंपरिक पद्धतीने हाताने तयार होणाऱ्या या चपला आजही देशभरात वापरल्या जातात. एकीकडे टिकाऊपणा आणि स्वस्त दरामुळे त्या लोकप्रिय असल्या, तरी आता त्याच चपला प्राडाच्या शोमध्ये हजारो डॉलर्सच्या किंमतीत पाहायला मिळाल्या आहेत.
कोल्हापुरीचा प्राडाच्या रॅम्पवर नादभारतीय परंपरेचा भाग असलेली कोल्हापुरी चप्पल आता थेट आंतरराष्ट्रीय फॅशन रॅम्पवर झळकली आहे. मिलान शहरात झालेल्या प्राडा (Prada) या जगप्रसिद्ध लक्झरी ब्रँडच्या Men’s Spring/Summer 2026 शोमध्ये कोल्हापुरी चप्पलला मानाचं स्थान देण्यात आलं. प्रसिद्ध
फॅशन डिझायनर मियुच्चिया प्राडा आणि राफ सायमन्स यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या शोमध्ये “A Shift of Attitude — Dismantling of Meaning, and Dismantling Power” म्हणजेच ‘शक्ती आणि अर्थ यांचं विघटन’ या थीम अंतर्गत विविध प्रयोग झाले. तेव्हा अनेक भारतीयांचं लक्ष वेधलं ते शतकानुशतकं भारतीय पुरुषांच्या पायात असलेल्या पारंपरिक कोल्हापुरी चप्पलेनं जी आता उच्चभ्रू फॅशनच्या झगमगाटात झळकतेय.
लोकल ते ग्लोबलगेल्या काही काळात आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर्स भारतीय पारंपरिक पोशाख, ॲक्सेसरीज आणि डिझाईन्सकडे वळताना दिसत आहेत. नेहरू जॅकेट, कुर्ते, अंगरखा, स्कार्फ आणि पगड्या यानंतर आता कोल्हापुरी चप्पलसारखा स्थानिक वारसा जागतिक स्टेजवर पोहोचतो आहे. विशेष म्हणजे, ही चप्पल प्राडाच्या शोमध्ये फक्त वापरलीच नाही, तर तिला एका विशिष्ठ पद्धतीने सन्मानित करण्यात आलं.
View this post on Instagram
A post shared by Sakal News (@sakalmedia)
शोचं आमंत्रण एका साध्या पण स्टायलिश लेदर रिंगच्या स्वरूपात देण्यात आलं होतं, ज्यात कोल्हापुरी चपलींच्या पारंपरिक टोकाच्या लूपचा स्पष्ट संदर्भ होता. हा बारकावा अनेकांच्या लक्षात आला आणि त्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. काहींनी याला 'सांस्कृतिक कलेची स्तुती' म्हणून पाहिलं, तर काहींनी यावर ‘कल्चरल अॅप्रोप्रिएशन’ अर्थात 'परंपरेचा व्यावसायिक वापर' म्हणून प्रश्न उपस्थित केले.
भारतीय फूटवेअर डिझायनर अपराजिता तूर यावर म्हणतात, “कोल्हापुरी आमच्यासाठी फक्त फॅशन नाही, ती आमची परंपरा आहे. जागतिक ब्रँड्सनी याला दाद दिली, हे स्वागतार्ह आहे. पण या मागे जे हात आहेत, त्यांना प्रकाशझोत मिळणं गरजेचं आहे.”
किंमतपण आपल्या याच वर्षानुवर्ष आणि नेहमीच्या वापरातील चपलेची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आपल्याकडे साधारण रु. ६०० मध्ये विकली जाणारी कोल्हापुरी चप्पल प्राडा मात्र £1000 म्हणजेच भारतीय रु. 1,16,996.90 इतक्या किंमतीला विकणार आहे.
View this post on Instagram
A post shared by Man's World India (@mansworldindia)
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.