न्यूयॉर्कमधील ग्वाटेमाला परिसरात अंत्ययात्रेत अंदाधुंद गोळीबाराच्या घटना समोर आली आहे. या गोळीबारत सात जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. अंत्ययात्रेला आलेल्या नागरिकांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सातही मृतदेह ताब्यात घेतले.


मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाटेमालामध्ये अंत्ययात्रा सुरू असतानाच काही अज्ञात बंदुकधारी तेथे आले. त्यांनी अंत्ययात्रेत घुसून मृताच्या कुटुंबावर आणि अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांवर गोळीबार सुरू केला. यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


गोळीबार केल्यानंतर आरोपींना घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. टोळीयुद्धातून हा गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.






Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.