मराठी : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) हे दिल्ली (Delhi) दौऱ्यावर निघाले आहेत. पावसाळी अधिवेशनात दिल्लीत शिवसेना खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे. तसेच देशभरातील राज्य प्रमुखांचीही भेट यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. संसद अधिवेशनकाळात एकनाथ शिंदे  हे आपल्या खासदारांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जात असतात. त्याप्रमाणे त्यांचा आजचा हा दिल्ली दौरा असल्याची माहीती देण्यात आली आहे.


शिवसेना खासदारांच्या मतदारसंघात अनेक प्रलंबीत प्रश्न


शिवसेना खासदारांच्या मतदारसंघात अनेक प्रलंबीत प्रश्न आहेत. ते प्रश्न शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे एनडीएच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेऊन सोडवणार आहेत. दरम्यान, संसद अधिवेशन काळात एकनाथ शिंदे आपल्या खासदारांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जात असतात. त्याचप्रमाणेच त्यांचा आजचा दिल्ली दौरा देखील असल्याची माहीती देण्यात आल्याचे उदय सामंत म्हणाले.


एकनाथ शिंदे काही राज्यप्रमुखांच्या भेटी घेणार, मंत्री उदय सामंतांची माहिती


एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे प्रत्येक अधिवेशनाला आपल्या खासदारांना भेटायला आणि त्यांची बैठक घेण्यासाठी दिल्लीला जात असतात. तसेच ते काही राज्यप्रमुखांच्या भेटी सुद्धा घेणार आहेत असे सामंत म्हणाले. भास्कर जाधव यांचे जे कार्यकर्ते आमच्या पक्षात आले त्यांनी पक्षप्रवेशावेळी जाधव यांच्यावर कुठलीही टीका त्यांच्यावर केली नाही. त्यांनी लिहलेलं पत्र हे भावनिक आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. ज्यांनी पक्षप्रवेश आमच्या पक्षात केला त्यांचे हेच म्हणणं होतं की भास्कर जाधव यांचा त्यांच्या पक्षात खच्चीकरण होत आहे. त्यामुळं त्यांनी जवळचा पक्ष जो बाळासाहेबांच्या विचारांचा आहे त्याचा विचार करावा असे उदय सामंत म्हणाले.


संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरु झाले आहे. 21 ऑगस्टपर्यंत हे पावसाळी अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात एकूण 21 बैठका होणार आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर हे पहिलेच संसदेचे अधिवेशन आहे. दरम्यान, या अधिवेशनात विरोधक विविध मुद्यांवरुन सरकारला धारेवर धरत असल्याचे पाहायला मिळत आहे.


महत्वाच्या बातम्या:


Shivsena Name Dispute: शिवसेना चिन्ह आणि नाव वादाला पुन्हा तारीख पे तारीख! अंतिम फैसला काही दिवसांवर आला असतानाच पुन्हा सुनावणी पुढे का ढकलली?





आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.