नवी मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी;
प्रतिपंढरपूरचा देखावा पाहण्यासाठी उत्साहवर्धक रांग
तुर्भे, ता. १ (बातमीदार) ः सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असताना, रविवारच्या सुट्टीच्या दिवशी शिवछाया मित्र मंडळाच्या नवी मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. ‘पहिला मानाचा सार्वजनिक गणेशोत्सव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी सुमारे सात ते आठ लाख भाविक हजेरी लावतात. यंदादेखील हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
सभामंडपात दरवर्षी विविध आकर्षक तसेच समाज प्रबोधनात्मक देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते. यावर्षी ५५व्या सार्वजनिक गणेशोत्सवात सभामंडपात प्रतिपंढरपूरचा देखावा विशेष आकर्षण म्हणून सादर केला आहे. या देखाव्यामुळे भक्तांना पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन नवी मुंबईतच घेता येते, तसेच सांप्रदायिक एकता व एकात्मता वृद्धिंगत होण्याचा संदेशही प्रसारित होतो. नवी मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, वसई, पनवेल आणि उरणहून भाविक मोठ्या संख्येने येतात. यावर्षी कार्यक्रमात दैनंदिन पूजा पाठ, भजन, भजन क्षेत्रातील उत्कृष्ट कलावंतांचा सन्मान, गरीब व गरजू महिलांना साडी-चोळी वाटप, शिलाई मशीन वितरण, रक्तदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर तसेच शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवछाया मित्र मंडळ यांनी यावर्षी फन फेअरचेही आयोजन केले आहे, जे विशेषतः मुलांसाठी आकर्षण ठरत आहे. भाविकांनी या उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि गणेशोत्सवाच्या आनंदात सहभागी व्हावे, असे मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.