सावर्डे शिबिरात
९० जणांची तपासणी
सावर्डे ः मुख्यमंत्री सहाय्यता निधी आरोग्य अभियानांतर्गत सावर्डे येथील श्री सार्वजनिक गणेश मंडळात आरोग्य तपासणी शिबिरात ९० लाभार्थ्यांनी आरोग्य तपासणी, तसेच ई-केवायसी आणि डोळे तपासणी केली. सार्वजनिक गणेश मंडळ, भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत वालावलकर रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शांताराम बागवे यांच्या हस्ते झाले. या वेळी मंडळाचे ज्येष्ठ संचालक कार्याध्यक्ष शांताराम भांबाडे, माजी अध्यक्ष तुकाराम साळवी, केतन पवार, प्रदीप राजेशिर्के, सुरेश घाणेकर, देवराज गरगटे, शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश सावर्डेकर, वालावलकर रुग्णालयातील डॉक्टर्स आणि त्यांचे कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नायकवडी, पर्यवेक्षक श्री. केळसकर आणि कर्मचारी उपस्थित होते.


एन. के. कलामंचचा
आसाममध्ये सन्मान
सावर्डे ः चिपळूणच्या एन. के. कलामंच संघाला आसाम येथे झालेल्या ग्रँड कल्चर शोमध्ये कला सन्मान हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मागील आठवड्यात चौकी गेट चांगसरी कामरूप आसाम येथे गणेशचतुर्थी निमित्त होणाऱ्या इंटरनॅशनल ग्रँड कल्चरल शोसाठी चिपळूणच्या एन. के. कला मंचाला विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. या कलामंचातील कलाकाराने आपल्या कलेची अदाकारी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या या कलेची दखल घेऊन आयोजकांनी कला सन्मान प्रदान केला. या कलाकारांना कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळी रत्नागिरी जिल्हा सांस्कृतिक विभाग अध्यक्ष देवराज गरगटे, सहभागी कलाकार सुयोग जावळे, दीपेश घाणेकर, संभवी मयेकर, सुनील चव्हाण, दीक्षा गावणंग, सानिका सावंत, रूपाली कदम उपस्थित होते.


सचिन खेडेकरला
ध्यानचंद पुरस्कार
संगमेश्वर ः कोंडअसुर्डे (ता. संगमेश्वर) येथील सचिन विनीत खेडेकर (वय ७) याचा मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सचिन सध्या कोल्हापूर येथील स्कूलमध्ये दुसरीत शिकत आहे. गेल्या वर्षभरापासून एसके स्केटिंग अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षक सुहास कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. त्याने शालेय, तालुका, जिल्हास्तरावर अनेक पदके पटकावली असून, ७९ मिनिटांचे सलग स्केटिंग करत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या कामगिरीबद्दल त्याचा कोल्हापूर येथील छत्रपती राजर्षी शाहू स्मारक सभागृहात गौरव करण्यात आला.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.