गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा!
प्रकल्पाविरोधातील सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या
गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणार नवी प्रवासी जेट्टी
Gateway of India : गेटवे परिसरातील प्रवासी जेट्टीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा मिळाला आहे. या प्रवासी जेट्टी प्रकल्पाच्या विरोधातील सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. आता गेटवे ऑफ इंडियाच्या शेजारी नवीन प्रवासी जेट्टी उभारण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास कमी होऊन सागरी पर्यटनात वाढ होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रवासी जेट्टी प्रकल्पाच्या विरोधात तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या तिन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुले प्रवासी जेट्टी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच नवी प्रवासी जेट्टी उभारली जाणार आहे.
Mumbai Maratha Protest : दोन दिवसात सर्व पूर्ववत करा, मुंबई हायकोर्टाचे मराठा आंदोलकांना निर्देशमुख्य न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपाठीने प्रवासी जेट्टी प्रकल्पाबाबत मोठा निर्णय दिला. याचिकाकर्ते आणि महाराष्ट्र सागरी मंडळ अशा दोन्ही बाजूंची सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर खंडपीठाने हा निर्णय घेतला. न्यायालयाने दाखल करण्यात आलेल्या तिन्हीही याचिका फेटाळल्या.
Maharashtra Politics : ठाकरे गटाला झटका! बडा नेता हाती घेणार 'भाजप'चं कमळप्रवासी जेट्टी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या याचिका फेटाळल्याने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाअंतर्गत मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणार नवी प्रवासी जेट्टी उभारली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना समुद्री प्रवासासाठी आधुनिक आणि जलद सुविधा मिळणार आहे. याशिवाय वाहतूक कोडीं कमी होऊन सागरी पर्यटनात वाढ होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'साम'च्या गणरायाची आरतीContact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.