swt3115.jpg
88391
पाटः येथील महाविद्यालयात (कै.) सिताबाई रामचंद्र परब यांना स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
सिताबाई परब यांना
पाटमध्ये अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १ः एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस. एल. देसाई व (कै.) सिताबाई रामचंद्र परब कनिष्ठ महाविद्यालयात (कै.) सिताबाई रामचंद्र परब यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य राजन हंजनकर यांनी केले. त्यांनी (कै.) सिताबाई परब यांच्या कार्यतत्परतेचा गौरव करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या समाजाभिमुख भूमिकेतून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर होते. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा. आयटी शिक्षण ही काळाची गरज असून ग्रामीण विद्यार्थ्यांना अशा सुविधा मिळणे ही समाधानाची बाब आहे, असे सांगितले.
ग्रामीण विद्यार्थ्यांना आयटी शिक्षणाचे अद्ययावत ज्ञान मिळावे या उद्देशाने (कै.) अंकुश परब यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ महाविद्यालयाला देणगी दिली. या देणगीतून महाविद्यालयात अत्याधुनिक आयटी लॅब उभारण्यात आली असून संगणक, प्रोजेक्टर व इंटरनेटसह सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या शेकडो विद्यार्थी या लॅबचा लाभ घेत असून डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी हे पाऊल ऐतिहासिक ठरत आहे. सूत्रसंचालन आयटी शिक्षक कासकर यांनी केले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.