सोलापूर : शेजारचीच्या सांगण्यावरून पतीने मला व मुलांना शिवीगाळ करून मारहाण केली. खोटे सांगून घटस्फोटाच्या अर्जावर स्वाक्षरी घेतली. त्याने व्यवसायाचे कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्रही फसवणूक करून घेतल्याची फिर्याद नागमणी चंद्रशेखर बेत (रा. पुंजाल क्रीडांगणासमोर, भद्रावती पेठ) यांनी जेलरोड पोलिसांत दिली.


सासरी नांदताना पती चंद्रशेखर बेत याने शेजारील सतना या महिलेचे ऐकून मुलांना व मला मारहाण केली. चोरीचे खोटे आरोप करून त्रास दिला. माहेरून १० लाख रुपये घेऊन ये म्हणून छळ केला. पैसे न आणल्यास तू आमच्याकडे यायचे नाही, तू आमच्यासाठी मेली, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादी विवाहितेचे शिक्षण कमी व इंग्रजी येत नसल्याने, मराठीचा अर्थबोध होत नसल्याचा गैरफायदा पतीने घेतला.


कलकत्ता येथील पार्टी व्यवसायाचे पैसे देत नाही, त्याच्याविरुद्ध केस करणार असल्याचे सांगून पतीने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले. १८ डिसेंबर २०१८ पासून पती छळ करत असल्याचे फिर्यादीत म्हटले. याप्रकरणी पती चंद्रशेखर बेत, सतना व आरती वींरेंद्र बंडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक मोरे तपास करीत आहेत.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.