मुंबईतील आझाद मैदानात मराठ्यांचे आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृ्त्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानात उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मुंबईमध्ये सर्वत्र मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मग ते रेल्वे स्थानक असू दे वा रस्ते असू द्या. सर्वत्र मराठी समाजाचे आंदोलकच दिसत आहेत. काहींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
आंदोलकांची भर रस्त्यावर आंघोळ
सोशल मीडियावर सध्या मराठा आंदोलकांचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचे दिसत आहेत. हे आंदोलक हट्टाला पेटल्याचे दिसत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईत मुक्काम असल्यामुळे काही मराठा आंदोलक भर रस्त्यावर आंघोळ करताना दिसत आहेत. या मराठा आंदोलकांचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
वाचा: अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स लिहिल्या; प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिनेत्रीने फोडला हंभरडा
The Maratha reservation protestors started bathing in the middle of Mumbai road blocking the traffic. These folks with zero civic sense are demanding reservations. pic.twitter.com/WDTTdLIpZ6
— Lord Immy Kant (@KantInEastt)
रेल्वे स्थानकात जल्लोष
मोठ्या संख्येने आंदोलक हे रेल्वे स्थानकांमध्ये दिसत आहेत. काहींनी रेल्वे स्थानकात ढोल वाजवत जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा बांधवाची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत. मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी आज बंद राहणार आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात करण्यात आलेल्या वाहतुकीच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना वाढीव कुमक ही देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
रेल्वे स्थानकात मराठा आंदोलाकांचा डान्स
मराठा आंदोलक हे हट्टाला पेटले असल्याचे दृश्य आहे. मनोज जरांगेंनी केलेल्या शांततेच्या आवाहनाकडे मराठा आंदोलकांनी पाठ फिरवल्याचे काहीसे म्हटले जात आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी बेस्ट बस अडवल्या आहेत. तर काही ठिकाणी थेट पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवर चढत आंदोलकांनी आंदोलन सुरु ठेवले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.