Narendra Modi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या कित्येक दिवसांपासून रशिया आण युक्रेन यांच्यातील युद्धावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन तसेच युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत बैठका घेतल्या. मात्र अद्याप हे युद्ध थांबवण्यात ट्रम्प यांना कोणतेही यश आलेले नाही. असे असतानाच आता भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. भारताने या युद्धाबाबत आता नव्याने आपली भूमिका जाहीर केली आहे.





फोनद्वारे संयुक्तपणे केली चर्चा 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच युरोपियन परिषद अध्यक्षेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन परिषदेच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी फोनद्वारे संयुक्तपणे चर्चा केली. याच चर्चेदरम्यान मोदी यांनी युक्रेनबाबतची भारताची भूमिका स्पष्ट केली.





तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा आदी मुद्द्यांवर चर्चा 


भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात फारच चांगले संबंध आहेत. एकमेकांप्रतीचा विश्वास, समान लक्ष्य या मूल्यांच्या आधारे भारत आणि युरोपीयन महासंघातील नाते फार दृढ आहे. यावेळी नरेंद्र मोदी-अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेयन यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, पुरवठा साखळीतील लवचिकता या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांत होत असलेल्या वृद्धीचे या तिन्ही नेत्यांनी यावेळी स्वागत गेले.


युक्रेनच्या मुद्द्यावर भारताने केली भूमिका स्पष्ट


यावेळी युक्रेन-रशिया यांच्यातील सुरू असलेला वाद लवकरात लवकर संपुष्टात यावा यासाठी एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली. तसेच नरेंद्र मोदी यांनी अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेयन या दोन नेत्यांनाही आगामी भारत-युरोपियन महासंघाच्या परिषदेला भारतात आमंत्रित केले.


युक्रेनवर नेमकी काय भूमिका मांडली?


या संवादात एकमेकांच्य हिताचे असणाऱ्या वेगवेगळ्या जागतिक तसेच प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा झाली. तसेच युक्रेन-रशिया यांच्यातील संघर्ष कसा संवता येईल यावरही या संवादात साधक-बाधक चर्चा करण्यात आली. यावेळी भारताने रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष सांततेच्या मार्गाने सोडवला जावा. तसेच या भागात लवकरात लवकर शांतता आणि स्थैर्य यावे ही भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.