मुंबई : राजधानीतील मराठा आरक्षण (मराठा) आंदोलनातील काही आंदोलकांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबईकर, आणि मुंबईकरांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आंदोलकांकडून हुल्लडबाजी होत असून आझाद मैदानाबाहेर, रेल्वे स्थानकावरही आंदोलक खेळ खेळतात, नाचतात, कुणासोबत दमदाटी करतात, असे म्हणत आंदोलकांवर टीका करण्यात आली. मात्र, आंदोलकांच्या बाजुनेही अनेकांनी पोस्ट केल्या, मनसेनंही आपला पाठिंबा दर्शवला. मात्र, आझाद मैदानातील या आंदोलनाने काही प्रश्न त्याला द्या राहत असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देोरा यांनी म्हटलं होतं. तसेच, यापुढे आझाद मैदानावर (Mumbai) आंदोलनास परवानगी देऊ नये, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे थेट मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, त्यांच्या पत्रानंतर होत असलेल्या टीकेनंतर त्यांनी घुमजाव केला आहे. तसेच, शिस्तबंद आंदोलनासाठी आपलं पत्र होतं, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय?
मुंबईच्या आझाद मैदानामध्ये नेहमी आंदोलनं होत असतात. पण याच आंदोलनांवर आता शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की, आझाद मैदानासारख्या ठिकाणी आंदोलनांना परवानगी देणं योग्य नाही. कारण, हे ठिकाण केवळ एक मैदान नाही, तर संपूर्ण दक्षिण मुंबईच्या संवेदनशील आणि ऐतिहासिक भागाचा केंद्रबिंदू आहे. आझाद मैदानाला लागूनच मुंबई महानगरपालिका उभी आहे, ती देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका. समोरच युनेस्को जग हेरिटेज साइट म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, जिथून दररोज लाखो प्रवासी स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करतात. मैदानाच्या अगदी जवळच मुंबई हायकोर्ट आहे, तर काही अंतरावर मंत्रालय आहे, जिथून महाराष्ट्राचं राज्यकारभार चालतो. याशिवाय आरबीआयचं मुख्यालय, मुंबई पोर्ट, आणि मंत्र्यांची मलबार हिलवरील निवासस्थाने ही महत्त्वाची केंद्रं याच परिसरात आहेत. या सगळ्या दृष्टीकोनातून, सुरक्षेच्या आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने आझाद मैदान आंदोलनांसाठी योग्य ठिकाण नाही, असं मत मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. मात्र, त्यांच्या या पत्रावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागली, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना आंदोलन काय समजणार? असा सवालही विरोधकांनी विचारला. तर कुणीही त्यांच्या या पत्राचे समर्थन करताना दिसून आले नाही. त्यानंतर, त्यांनी पु्न्हा ट्विट करत घुमजाव केले आहे.
मी नेहमीच असा विश्वास ठेवला आहे की आंदोलन करणे हा प्रत्येक भारतीयाचा घटनात्मक अधिकार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत मी राहतो याचा मला अभिमान आहे. माझे मुख्यमंत्री यांना पाठवलेले पत्र हे मुंबईत आंदोलनं बंद करण्यासाठी नव्हते, तर ती शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत आणि रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य कष्टकरी मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी होते. मी सांगू इच्छितो की दररोज किमान दोनदा खोटं बोलणार्यामानसिक उपचारांची तातडीने गरज असलेल्या, बाळासाहेबांच्या विचारसरणीला तिलांजली देऊन राजकीय फायद्यासाठी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी, माझं पत्र नीट वाचा, असे म्हणत खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी उलट केला आहे.
आणखी वाचा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.