छगन भुजबाल समता परिषद: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजात नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या समता परिषदेकडून ओबीसींच्या न्यायहक्कासाठी राज्यभर आंदोलन छेडण्याची घोषणा करण्यात आली आहे. “मराठ्यांना आरक्षण द्यायलाच हवं, मात्र ते ओबीसींच्या ताटातलं नको,” ही छगन भुजबळ यांची भूमिका रास्त असल्याचं मत समता परिषदेकडून व्यक्त करण्यात आलं आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयावर छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. ओबीसी आरक्षणावर कोणतेही गालबोट न लागू देता, संविधानिक मार्गानेच मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं, ही त्यांची ठाम भूमिका आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी भुजबळ कटिबद्ध असून, मंत्रीपदापेक्षा त्यांना ओबीसी नेता म्हणून ओळख मिळणं महत्त्वाचं वाटतं, असं समता परिषदेकडून सांगण्यात आलं आहे.
समता परिषदेने स्पष्ट केलं आहे की, “भुजबळ मंत्रिमंडळात असोत वा नसोत, ओबीसी लढ्याच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही त्यांच्यासोबत राहू.” त्यांच्या नेतृत्वात यापूर्वीही ओबीसींसाठी निर्णायक संघर्ष झाला आहे आणि आता पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावर असलेला धोका दूर करण्यासाठी राज्यभर समता परिषद विविध ठिकाणी आंदोलन करणार आहे.
समता परिषदेच्या नेत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “छगन भुजबळ हे पहिले ओबीसी नेते आहेत, नंतर मंत्री. त्यांनी नेहमीच ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरून लढा दिला आहे. त्यामुळे या वेळीही जर सरकारने ओबीसींच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण राज्यात समता परिषद ताकदीने आंदोलन करेल.”
छगन भुजबळ लवकरच आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक ओबीसी संघटना आणि कार्यकर्ते त्यांची वाट पाहत असून, सरकारसमोर एक नवीन आणि निर्णायक ओबीसी आंदोलन उभं राहण्याची चिन्हं दिसू लागली आहेत, आता छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर घेतलेल्या भूमिकेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. नाशिकमधील भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.