Ashish Kapoor Arrested In Pune: अलिकडेच टेलिव्हिजन (Television News) जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका महिलेनं 40 वर्षांच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप (Famous Actor Accused Of Rape) करत तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पुण्यातील अभिनेत्याला अटक केली आहे. राष्ट्रीय राजधानीच्या सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. महिलेनं तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर पोलिसांनी 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता आशिष कपूरला (Ashish Kapoor) अटक केली आहे.  


आशिष कपूरनं बाथरुममध्ये केलेला बलात्कार 


एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, महिलेनं आशिष कपूरविरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये तिनं अनेक गंभीर आरोप लावले आहेत. महिलेनं म्हटलं आहे की, "ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात अभिनेत्यानं दिल्लीतील त्याच्या मित्राच्या घरी एक घरगुती पार्टीचं आयोजन केलं होतं आणि या दरम्यान अभिनेत्यानं मुलीला बाथरूममध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. महिलेनं 11 ऑगस्ट रोजी दिल्लीत अभिनेत्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता, त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही काळापासून वेगवेगळ्या ठिकाणांहून आशिषच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या पोलिसांनी अखेर त्याला पुण्यातून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेनं सुरुवातीला तिच्या तक्रारीत इतर काही लोकांची नावं सांगितली होती, पण नंतर तिनं त्यात काही बदल केले. कथितरित्या, महिलेनं यापूर्वी तिच्या तक्रारीत आशिष व्यतिरिक्त इतर दोघांवर बलात्काराचा आरोप केला होता, पण नंतर तिनं त्यांची नावं काढून फक्त आशिषचंच नाव ठेवलं. 


इंस्टाग्रामवर आशिष आणि महिलेची पहिली भेट 


आशिषनं महिलेवर बलात्कार करताना त्या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ शूट केलेला. दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांना अद्याप कोणताही व्हिडीओ सापडलेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, महिला आणि आशिष इंस्टाग्रामद्वारे (Instagram) एकमेकांशी जोडलेले होते आणि अभिनेत्यानं तिला पार्टीसाठी आमंत्रित केलं होतं. यापूर्वी आशिष, त्याचा मित्र आणि त्याच्या मित्राच्या पत्नीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. पण नंतर अभिनेत्याचा मित्र आणि त्याची पत्नी दोघांनाही अटकपूर्व जामीन मिळाला.


 


Suhana Khan Alibaug Land Purchase Case: शाहरुख खानच्या लेकीनं स्वतःला शेतकरी दाखवून 12.91 कोटींची जमीन लाटली? प्रकरण नेमकं काय?

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.