बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






35 व्या किशोर व किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अफलातून, आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ साकारत उपांत्य फेरीत दणदणीत प्रवेश केला.


थीम पार्क मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राने प्रतिस्पर्ध्यांना संधी न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. किशोर गटात महाराष्ट्राने मणिपूरचा, तर किशोरींनी विदर्भावर सहजसुंदर विजयाची नोंद करत आपली आगेकूच कायम ठेवली. आता उपांत्य फेरीत किशोर संघ ओडिशाविरुद्ध भिडेल, तर किशोरींची गाठ पंजाबशी पडेल. तसेच कोल्हापूर विरुद्ध उत्तर प्रदेश आणि राजस्थान विरुद्ध हरयाणा अशा अन्य उपांत्य लढती रंगतील.


किशोर गटाच्या उपउपांत्य फेरीत महाराष्ट्रासमोर मणिपूरचा निभावच लागला नाही. एकतर्फी झालेल्या या सामन्यात मणिपूरचा 30-21 असा 5.35 मि. राखून 9 गुणांनी दणदणीत पराभव केला. महाराष्ट्राकडून वरद पोळ, सूरज खाडे, प्रफुल्ल वसावे, विक्रम राठोड यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.