खोपोलीत विश्वकर्मा जयंतीनिमित्त सजावट स्पर्धा
खालापूर, ता. ५ (बातमीदार) : विश्वकर्मा जयंती उत्सवाच्या निमित्ताने सुतार पत्रिका विश्व कॅलेंडर प्रतिनिधीतर्फे खोपोली परिसरात घरगुती उत्सव सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेअंतर्गत सुतार पत्रिका विश्वचे वार्ताहर, प्रतिनिधी यांनी घरोघरी भेट देऊन सजावटीची पाहणी केली. त्यानंतर प्रथम तीन क्रमांकांचे विजेते घोषित करण्यात आले. मच्छिंद्र यादव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. जय खेडेकर यांनी द्वितीय, तर राजू पडघमकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण नगरसेवक सुनील पाटील तसेच सुतार पत्रिका विश्व कॅलेंडरच्या प्रतिनिधी आसावरी घोसाळकर यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमामुळे विश्वकर्मा जयंती उत्सवाला सामाजिक व सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाल्याचे नागरिकांनी व्यक्त केले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.