येवला: शेतात पिकविलेल्या कांद्याला किलोमागे २५ रुपये खर्च येत असताना बाजारभाव मात्र कवडीमोल मिळत आहेत. गेल्या १५ दिवसांत क्विंटलमागे ५०० रुपयांची घसरण झाल्याने, संतप्त शेतकऱ्यांनी आज छावा क्रांतिवीर सेनेच्या नेतृत्वाखाली येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्ता रोको आंदोलन केले.
१९ जानेवारीला सरासरी १४०० रुपये असलेला दर आज ९५० रुपयांपर्यंत खाली आल्याने उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश संपर्कप्रमुख गोरख संत व तालुकाध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रथम बाजार समितीतील लिलाव बंद पाडले. त्यानंतर आंदोलकांनी नगर-मनमाड मार्गावर ठिय्या मांडला. "कांद्याला २ हजार रुपये हमीभाव द्यावा आणि विक्री झालेल्या कांद्याला १ हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान मिळावे," अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर तहसीलदार आबा महाजन यांनी घटनास्थळी येत आंदोलकांची भेट घेतली. यावेळी विजय मोरे, सोपान लांडगे, दीपक सहानखोरे, सागर पठारे, संतोष कदम, संदीप पवार, वैभव भड, प्रिया वरपे, गोरख सांबरे, गोरख कोटमे आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Mangalwedha Election 2026 : मंगळवेढ्यात निवडणुकीची प्रशासकीय यंत्रणा सज्ज, मतदारांसाठी मताधिकार हे मोबाईल ॲपआंदोलनातील प्रमुख मागण्या
मे महिन्यापासून विकलेल्या कांद्याला क्विंटल १ हजार रुपये अनुदान द्यावे
कांद्याची निर्यात खुली करण्यात यावी, व्यापाऱ्यांना निर्यातीसाठी अनुदान द्यावे
आधारभूत भावापेक्षा कमी भावाने विकलेल्या मक्याला राज्य व केंद्र शासनाने ५० टक्के रक्कम मका उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावी
३० जून २०२६ पर्यंत झालेल्या कर्जावर कुठल्याही अटी व शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी द्यावी
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.