पिंपरी, ता.५ ः ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘जिव्हाळा’ या वार्षिक अंकाचे ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष गोपाळ भसे, कोषाध्यक्ष अरविंद जोशी, अंकाचे संपादक नंदकुमार मुरडे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात वैवाहिक सहजीवनाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या दांपत्यांसह वाढदिवसानिमित्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध स्पर्धांमधील विजेत्या सभासदांना रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली.
अध्यक्ष रमेश इनामदार यांनी प्रास्ताविक केले. श्यामकांत खटावकर यांनी सूत्रसंचालन केले. शहाजी कांबळे यांनी आभार मानले. भिवाजी गावडे, अलका इनामदार, नारायण दिवेकर आदींनी संयोजनात परिश्रम घेतले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.