अॅड. वैद्य यांचे
दापोलीत व्याख्यान
दापोली, ता. ५ ः तालुका ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दापोलीतील अॅड. विद्याभूषण वैद्य यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हाताळलेल्या १४ महत्त्वाच्या खटल्यांच्या संदर्भात त्यांनी माहिती दिली. या वेळी अॅड. वैद्य यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करताना अवलंबलेल्या पद्धतींचा आढावा घेतला. घटनेमुळे नागरिकांना मिळालेले मूलभूत हक्क व स्वातंत्र्य यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राजाराम मडव यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष श्रीकृष्ण पेठे यांनी प्रमुख पाहुणे अॅड. विद्याभूषण वैद्य यांचा परिचय करून दिला. जानेवारी २०२६ मध्ये वयाची वाढ झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा अॅड. वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी प्रा. नंदकिशोर भागवत यांनीही मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजीराव कदम, उल्हासराव सावंत, प्रेमानंद महाकाळ, चंद्रशेखर शेठ, हसमुख पांगारकर, सुधीर साटम तसेच शीतल तवसाळकर यांनी सहकार्य केले. सचिव प्रकाश बेर्डे यांनी आभार मानले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.