नाशिक: कापडणीस पिता-पुत्राच्या खून प्रकरणातील संशयिताने दिंडोरी नाका येथील पानटपरी चालकाला खंडणीसाठी ठार करण्याची धमकी देत गल्ल्यातील पाच हजारांची रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पंचवटी पोलिसांत जबरी चोरीसह खंडणीचा गुन्हा दाखल करीत संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. विकास हेमके असे संशयिताचे नाव आहे. २०२२ मधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव नानासाहेब कापडणीस व डॉ. अमित कापडणीस या दुहेरी खूनप्रकरणातील तो सहसंशयित आहे.
कैलास रत्नाकर ढोरे (५१, रा. सुनंदा हाईट्स, काठे गल्ली, द्वारका) यांच्या फिर्यादीनुसार, दिंडोरी नाक्यावर त्यांची कैलास पान स्टॉल आहे. गेल्या मंगळवारी(ता.३) रात्री साडेसातला संशयित हेमके हा त्यांच्या पानटपरी आला. त्याने, ‘तु मला ओळखत नाही का?, मी विकास हेमके, पंचवटीचा भाई, मी येथे खून, दरोडे केले आहेत.
मला दर महिन्याला हप्ता द्यावा लागेल, पैसे दे, नाहीतर तुला मी पाहून घेईल’, अशी धमकी दिली. त्याचवेळी त्याने ढोरे यांच्या पानटपरीच्या गल्ल्यात हात घालून पाच हजारांची रोकड बळजबरीने काढून घेतले. तसेच, ‘मला हप्ता द्यावा लागेल. नाहीतर तुझे दुकान इथे चालू देणार नाही. मला वेळेवर खंडणी दिली नाही तर, तुला ठार मारेल'', अशीही धमकी देत तो दुचाकीवरून पसार झाला.
या घटनेने घाबरलेल्या ढोरे यांनी पंचवटी पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यानुसार जबरी चोरीसह खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पंचवटी पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला मध्यरात्री अटक केली आहे. तपास सहायक निरीक्षक शरद पाटील करत आहेत.
Chorla Ghat : नाशिक ते बेळगाव धागेदोरे; चोर्ला घाट लूट प्रकरणाने उडवली राज्यसीमांपलीकडे खळबळदोन महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर
दरम्यान, संशयित विकास हेमके हा २०२२ मधील कापडणीस पिता-पुत्रांच्या खून प्रकरणातील सहसंशयित आहे. तर या गुन्ह्याचा राहुल जगताप, प्रदीप शिरसाठ, सूरज मोरे हे मुख्य संशयित आहेत. यातील मुख्य संशयित जगताप नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहे तर उर्वरित संशयित जामीनावर बाहेर आहेत. दोनच महिन्यांपूर्वी हेमके हा देखील कारागृहातून जामीनावर सुटला आहे. मात्र त्याला गांजा, दारुचे व्यसन असून आर्थिक चणचणीतून त्याने पानटपरी चालकाला धमकावत त्याच्याकडून खंडणी उकळल्याचे तपासातून समोर आले आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.