ओतूर, ता. ५ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सोमवारी (ता. २) शिवनेरी गडावर किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेतील ३० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या प्रसंगी गड परिसरातील प्लॅस्टिक व इतर कचरा संकलन, पायवाटांची स्वच्छता तसेच पर्यटकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी स्वप्निल डुंबरे, महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ. मोनिका रोकडे, जुन्नर येथील वनपाल नितीन विधाटे आणि वनरक्षक देविदास मिसाळ यांनी मार्गदर्शन केले. ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. ‘स्वच्छ गड-सुंदर गड, आपला गड-आपली जबाबदारी’ हा संदेश देत मोहिमेची सांगता करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.