इचलकरंजीत कौटुंबिक वादातून प्राणघातक हल्ला
सख्ख्या भाऊजीने मेहुण्यावर हल्ला केला
जखमी मनोज बडवे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू
आरोपी महेश काजवे याला पोलिस कोठडी
कोल्हापूर मधील इचलकरंजीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सख्ख्या भाऊजींनी मेहुण्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. जुन्या कौटुंबिक वादातून हा हल्ला झाला आहे. एएससी कॉलेज परिसरात काल सकाळच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. ए वन वडा सेंटरचे मालक मनोज बडवे हे गंभीर जखमी झाले असून आरोपी महेश काजवे याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
मनोज बडवे हे नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास आपले दुकान उघडत होते. त्याचवेळी महेश काजवे हे अचानक तेथे आले आणि कोणतीही पूर्वसूचना न देता मनोज बडवे यांच्या डोक्यावर लाकडी माऱ्याने जोरदार वार केला. या हल्ल्यात मनोज बडवे (Manoj Badwe) गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत जखमी मनोज बडवे यांना उपचारासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल केले.
Online Shopping Fraud : स्वस्त साडी घेणं महागात पडलं! भुलथापांना बळी पडली अन् खातं रिकामं झालं, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून घटनास्थळाची पाहणी केली. तपासात उघड झाले की, मनोज बडवे आणि महेश काजवे हे जवळचे नातेवाईक असून गेल्या काही वर्षांपासून मनोज बडवे हे महेश काजवे व त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होते.
Shocking : स्टॅमिनाच्या गोळ्या खायचा, रात्री अगणित छळ करायचा... वैतागलेल्या बायकोनं नवऱ्यासोबत असं काही केलं की हादरून जाल!मात्र महेश काजवे हे कोणतेही कामधंदा न करता दारूच्या नशेत राहत असल्याने घरगुती वाद वाढले. अखेर सुमारे दोन वर्षांपूर्वी मनोज बडवे यांनी त्यांना घराबाहेर काढले होते. त्याच रागातून महेश काजवे यांनी यापूर्वीही मनोज बडवे यांना शिवीगाळ व धमक्या दिल्याचे समोर आले आहे. हल्ल्यानंतर संतप्त नागरिकांनी महेश काजवे यांना पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी गोंधळ घालत घटनास्थळावरून पलायन केले.
Kokan Railway News : आंगणेवाडीच्या जत्रेला जाताय? मुंबईतून विशेष ट्रेन धावणार, वेळापत्रक काय? तिकीट बुकिंग कधी करता येणार?पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून संशयित आरोपी महेश काजवे याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे एएससी कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडूनपुढील तपास सुरू आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.