केळघर- शिर्डी साई दिंडीचे प्रस्थान


केळघर, ता. ५ : ॐ श्री साई नाथायच्या जयघोषात केळघर ते शिर्डी पायी चालत जाणाऱ्या साई दिंडीचे नुकतेच प्रस्थान झाले.
मान्यवरांच्या हस्ते साई पालखीचे पूजन करण्यात आले. संपूर्ण गावातून साई पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, पंचायत समितीचे माजी सभापती बापूराव पार्टे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अंकुश कदम, प्रतापगड साखर कारखाना संचालक आनंदराव जुनघरे, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष साधू चिकणे, साई मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र धनावडे, उपाध्यक्ष जगन्नाथ पार्टे, बबनराव बेलोशे, सचिन पार्टे, आतिष कदम, बापू दळवी, संजय पार्टे, तुषार गाडवे आदी उपस्थित होते. साई पालखीसह दिंडी सोहळा १२ तारखेला शिर्डीत पोहचणार आहे. या दिंडी सोहळ्यात भाविक भक्त, महिला सहभागी झाल्या आहेत.


A01369
केळघर : साई पालखीसह दिंडी सोहळ्याच्या प्रारंभप्रसंगी ज्ञानदेव रांजणे, राजेंद्र धनावडे, जगन्नाथ पार्टे आदी.


..............................................

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.