वेस्टइंडीजने यावेळच्या टी-20 विश्वचषकाची सुरुवात अतिशय शानदार पद्धतीने केली आहे. या सामन्यात कॅरेबियन खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी करत 35 धावांनी विजय मिळवला. टीमचा स्टार अष्टपैलू जेसन होल्डरसाठी (Jason Holder) हा सामना अविस्मरणीय ठरला, कारण त्याने या सामन्यात असा पराक्रम केला आहे जो आतापर्यंत वेस्टइंडीजचा एकही खेळाडू करू शकलेला नाही. त्याने या सामन्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.


धडाकेबाज अष्टपैलू जेसन होल्डरने या सामन्यात 3.5 ओव्हरमध्ये 30 धावा देऊन 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याच्या या घातक गोलंदाजीसमोर स्कॉटलंडचा संघ 18.5 ओव्हरमध्ये केवळ 147 धावाच करू शकला. होल्डरसमोर स्कॉटिश फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. होल्डरने वेस्टइंडीजसाठी आतापर्यंत खेळलेल्या 90 सामन्यांच्या 86 डावांत 101 विकेट्स घेतल्या आहेत. या प्रवासात त्याने एकदा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला असून त्याचा इकॉनॉमी रेट 8.67 राहिला आहे.


34 वर्षांचा जेसन होल्डर आता वेस्टइंडीजसाठी टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. तो 101 विकेट्ससह या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अकील हुसैनचे नाव असून त्याने 86 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रोमारियो शेफर्ड (Romario shepherd) आहे, ज्याच्या नावावर 80 विकेट्स आहेत. रोमारियोने याच सामन्यात कमाल करताना 5 विकेट्स घेतल्या आणि हॅट्ट्रिक घेण्याचा भीमपराक्रमही केला.


वेस्टइंडीजसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज:


जेसन होल्डर 101
अकील हुसेन 86
रोमॅरियो शेफर्ड 80
ड्वेन ब्राव्हो 78
अल्झारी जोसेफ ६२


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.