धाराशिवमधील ढोकी पंचायत समिती गणात एक मताने निकाल फिरला


ठाकरे गटाचे अमर समुद्रे एका मताने झाले विजयी


भाजप उमेदवार निहाल काझी यांचा एका मताने पराभव


बालाजी सुरवसे, साम टीव्ही


लोकशाहीत १८ वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांनी मतदान करावे, असे वारंवार आवाहन केले जाते. लोकशाहीत मतदानानंतरच सत्ता कोणाची येणार, हे ठरत असते. भारतीय संविधानात श्रीमंत उद्योजक आणि रस्त्यावरील गरीबाच्या मताला समान महत्व देण्यात आलं. लोकशाहीत एका मतामुळे निकाल फिरू शकतो, हे अनेकदा घडलेले आहे. धाराशिवमध्येही याची प्रचिती आली आहे. धाराशिवमध्ये एका मताने ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आहे.


धाराशिवातील ढोकी पंचायत समिती गणातून ठाकरे गटाचे अमर समुद्रे अवघ्या एक मतांनी विजयी झाले आहेत. अमर समुद्रे यांना 3187 मते मिळाली. तर भाजपाचे निहाल काझी यांना 3186 मते मिळाली. त्यामुळे अमर समुद्रे यांना विजयी घोषित करण्यात आले.

परभणीत उद्धव ठाकरेंना धक्का; जिल्हा परिषदेवर भाजपने झेंडा फडकावला, तुमच्या गटातून कोण विजयी?

अमर समुद्रे विजयी झाल्यानंतर पुन्हा मतमोजणी करण्यात आली. मात्र त्यातही अमर समुद्रे विजयी असल्याचे स्पष्ट झाले. विजयी झाल्यानंतर राजकीय दबावातून निकाल लांबवल्याचा आरोप अमर समुद्रे यांनी केला. मतमोजणी केंद्रावर वकिलांना बोलवावं लागलं. वकिलांच्या युक्तिवादानंतर एक मताने विजय झाल्याचं जाहीर करण्यात आलं. राज्यातील एकमेव रात्री उशिरापर्यंत लांबलेला निकाल अखेर जाहीर झाला.

Explainer : जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष, देवेंद्र-रविंद्र यांची जोडी पुन्हा हिट, काय आहेत विजयाची कारणे?

निकाल जाहीर झाल्यानंतर रात्री आठ वाजता अमर समुद्रे यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रासमोर जल्लोष केला. एका मताचे महत्त्व शब्दात सांगूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया अमर समुद्रे यांनी दिली.


ठाकरे आणि भाजच्या उमेदवारांना किती मते मिळाली?


अमर समुद्रे यांना 3187 मते मिळाली आहेत. तर भाजपचे निहाल काझी यांना 3186 मते मिळाली आहेत.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.