सातारा : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६५ व पंचायत समितीच्या १२९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या (Satara Zilla Parishad Election Results 2026) निकालात कोणत्याही पक्षाला जिल्हा परिषदेच्या सत्तेत जाण्यासाठी लागणारा बहुमताचा ३३ हा आकडा गाठता आलेला नाही. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला २७, राष्ट्रवादी काँग्रेसला २०, तर शिंदेंच्या शिवसेनेला १५, काँग्रेसला एक, स्वाभिमानीला एक आणि एक जागा अपक्ष निवडून आला आहे.


भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना मिळून सत्ता स्थापन करु शकतात; पण राज्यातील सत्तेचा विचार करताना एकनाथ शिंदेंची शिवसेना ज्यांच्यासोबत जातील, त्यांची सत्ता येणार असून सत्तेच्या चाव्या शिंदेंच्या शिवसेनेकडे (Satara Panchayat Samiti Results) राहिल्या आहेत.


जिल्ह्यातील अकरा पंचायत समितींपैकी सातारा व खटाव पंचायत समितीत भाजपची सत्ता आली आहे. तर वाई, खंडाळा, कोरेगाव या पंचायत समितीची सत्ता राष्ट्रवादीकडे राहिली असून पाटण शिवसेनेकडे तर जावळी, माण, महाबळेश्वर, फलटण समसमान झाल्यामुळे चिठ्ठीव्दारे सत्ता कोणाकडे हे स्पष्ट होणार आहे.

Satara ZP Election Winner List 2026 : सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल; वाचा कोण जिंकले? कोण हरले? पाहा विजयी उमेदवारांची यादी

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यावेळेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली. तर पाटण, फलटण, कोरेगावमध्ये शिंदेंची शिवसेनेशी लढत झाली. जिल्हा परिषदेतील सत्ता हातून जाऊ नये यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्या. लोकसभेच्या निवडणुकीपासून आघाडी घेतलेल्या भारतीय जनता पक्षाला यावेळेतस कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकावायचा होता. त्यादृष्टीने त्यांचे दोन मंत्री आणि दोन आमदार यांनी प्रयत्न केले. तर, जिल्ह्यात कोरेगाव आणि पाटण तालुक्यात ताकत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेने यावेळेतस फलटण, कोरेगाव, पाटण, जावळी, महाबळेश्वर, सातारा तालुक्यातही उमेदवार दिले होते.


निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे झालेले अपघाती निधन राष्ट्रवादी काँग्रेसला धक्कादायक ठरले. पण, त्यांच्या निधनाच्या सहानुभूतीचा थोडाफार फायदा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत फारसा झाला नाही. मागील निवडणुकीत ४१ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला यावेळेस निम्म्याच जागा मिळवता आल्या आहेत. तर, फलटणमध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेच्या साथीने आपली सत्ता राखण्यात यश मिळविले आहे.

Satara ZP Result 2026 : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे खंदे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांना होमग्राऊंडवर धक्का; पत्नी अर्चना रांजणे यांचा 180 मतांनी पराभव

आज झालेल्या निकालात कोणत्याच पक्षाला जिल्हा परिषदेच्या सत्तेत जाण्यासाठीचा बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. उलट शिंदेंच्या शिवसेनेला कधी नव्हते १५ च्या वर सदस्य निवडून आणले आहेत. भाजपचे २७ सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २० सदस्य निवडून आले आहेत. तर अकरा पंचायत समितींपैकी दोन भाजप, तीन राष्ट्रवादीकडे आणि जावळी, माण, महाबळेश्वर आणि फलटणमध्ये समसमान झाले आहेत.


सातारा व खटाव पंचायत समितीत भाजपची सत्ता आली आहे. तर वाई, खंडाळा, कोरेगाव या पंचायत समितीची सत्ता राष्ट्रवादीकडे राहिली असून पाटण शिवसेनेकडे तर जावळी, माण, महाबळेश्वर, फलटण समसमान झाल्यामुळे येथे चिठ्ठीव्दारे सत्ता कोणाकडे जाणार हे स्पष्ट होणार आहे.

वैशिष्ट्ये...

  • मंत्री जयकुमार गोरेंना गट, गणात धक्का


  • शिवेंद्रसिंहराजेंच्या तालुक्यात राष्ट्रवादीचा प्रवेश


  • जावळी, फलटणमध्ये शिवसेनेचा प्रवेश


  • रामराजेंनी फलटणचा गड राखला


  • मकरंद पाटलांची गट, गणात सरशी


  • खटाव, सातारा पंचायत समितीत भाजपची सत्ता


  • कोडोली गटातून उदयनराजेंचा उमेदवार अध्यक्ष पदाचा दावेदार


  • राष्ट्रवादीचे दिग्गज उमेदवार पराभूत


  • अजितदादांच्या सहनुभूतीचा लाभ घेता आला नाही


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.