तळेगाव दाभाडे : मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत वर्चस्व प्रस्थापित करत दहाही जागांवर विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर सभापतीपदी चांदखेड गणातून विजयी झालेल्या सुनीता येवले, तर उपसभापतीपदी सोमाटणे गणातील साहेबराव कारके यांची नावे आमदार सुनील शेळके यांनी जाहीर केली.


यावेळी शेळके म्हणाले, ‘‘जनतेने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांवर विश्वास ठेवून मोठ्या फरकाने विजयी केले. हा विश्वास कायम ठेवत पुढील पाच वर्षे सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. जो काम करेल तोच जनतेचा नेता ठरेल.’’
मावळला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवून देण्याचाही त्यांनी निर्धार व्यक्त केला. ‘‘इतिहासात प्रथमच राष्ट्रवादीला सर्व जागा मिळाल्या आहेत. मात्र, तालुक्याला अद्याप जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळालेले नाही. ते पद तसेच विविध खात्यांची सभापतीपदे मावळला मिळावीत, यासाठी प्रयत्न करणार,’’ असे शेळके यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या या एकहाती विजयामुळे तालुक्यात पक्षाची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.