‘कृषी पदव्युत्तर’ प्रवेशासाठी
पीजी-सीईटी अर्ज प्रक्रिया सुरू
अंतिम मुदत २३ फेब्रुवारीपर्यंत
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतील पदव्युत्तर (मास्टर्स) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पीजी-सीईटी २०२६ ची अधिसूचना विद्यापीठ परीक्षा मंडळाने जाहीर केली आहे. यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २९ जानेवारीपासून सुरू झाली असून, यासाठीची अंतिम मुदत २३ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.
कृषी विषयातील पदव्युत्तर विज्ञान पदवी एम.एस्सी (कृषी), एम.एस्सी(उद्यानविद्या), एम.टेक (कृषी अभियांत्रिकी), एमबीए (कृषी व्यवसाय व्यवस्थापन), एम.एस्सी. (वनीकरण), एम.एस्सी (मत्स्यशास्त्र आणि समुदाय विज्ञान), एम.एस्सी (काढणीपश्चात व्यवस्थापन-पी.एच.एम) अशा विविध विषयांसाठी ही परीक्षा होणार आहे. अर्ज, माहिती पुस्तिका व सविस्तर सूचना www.mcaer.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
परीक्षा आणि शुल्क
पीजीची-सीईटी परीक्षा २०० गुणांची असून, यासाठी दोन तासांचा कालावधी असेल. चुकीच्या उत्तरांना नकारात्मक गुणांकन नाही. खुल्या व अन्य राज्यातील उमेदवारांसाठी प्रति विषय शुल्क ९०० रुपये, तर महाराष्ट्रातील आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७०० रुपये आहे. एकापेक्षा अधिक विषयांसाठी अर्ज केल्यास शुल्क त्यानुसार भरावे लागेल.
अर्जाची अंतिम मुदत : २३ फेब्रुवारी
पात्र, अपात्र यादी : २७ फेब्रुवारी
अंतिम पात्र यादी : १७ मार्च
प्रवेश पत्र : १ एप्रिलपासून
परीक्षा : ११, १२ व १३ एप्रिल
परीक्षा केंद्र ः १७ महाविद्यालय
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.