मोहोळ - एका फॉर्चुनर कारने मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तेलंगवाडी फाट्यावर सोमवार ता 9 रोजी सायंकाळी 6.30 वाजता झाला. राहुल बाळासाहेब कदम रा तेलंगवाडी, दत्तात्रेय मुळे रा खंडाळी अशी मृतांची नावे आहेत.
मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, राहुल कदम व दत्तात्रय मुळे हे मोटरसायकल नंबर एम एच 13 सीएक्स 0201 वरून रस्ता क्रॉस करताना, सोलापूरहून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या फॉर्च्यूनर कार क्रमांक एम एच 24 बीएक्स 6715 हिने मोटरसायकलला जोराची धडक दिली.
त्यात वरील दोघे जण गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने उपचारा साठी मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच वरील दोघांना मृत घोषित केले.
या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून, अधिक तपास अपघात पथकाचे अंमलदार अतुल क्षीरसागर करीत आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.