निरगुडसर, ता. १० ः वळती (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत सलग दोन वर्षापासून अनोखा उपक्रम राबवत असून, मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना दशक्रिया घाटावरच मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येत आहे. आतापर्यंत ग्रामपंचायतीकडून २५ कुटुंबांना मृत्यूचे दाखले दशक्रिया घाटावरच देण्यात आले, असल्याची माहिती सरपंच आनंद वाव्हळ आणि उपसरपंच तेजस भोर यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने महाराष्ट्र शासनाचा शरद आदर्श कृषी ग्राम प्रगतशील गाव म्हणून ओळख निर्माण असणाऱ्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच बायोगॅस, वैयक्तिक लाभ, तर आंतरजातीय विवाह अनुदान मिळवून देणाऱ्या अनेक योजना राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या वळती ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने अनेक अभिनव उपक्रम राबविले आहे. त्यामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना दशक्रिया घाटावरच मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येत आहे ही परंपरा सलग दोन वर्षे चालू आहे.
सरपंच आनंद वसंत वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी ज्योती वेताळ या सर्वांच्या निर्णयानुसार वळती गावातील मृत व्यक्तींचे मृत्यू प्रमाणपत्र (दाखला) हा दशक्रिया घाटावर मागील दोन वर्षांपासून देण्यात येत असून, नागरिकांमध्ये समाधान, तर सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. स्वर्गीय दत्तू कृष्णा गांजवे यांचे मृत्यू प्रमाणपत्र ग्रामपंचायतीकडून दशक्रिया विधी संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांच्या कुटुंबीयांना वितरित करण्यात आल्याची माहिती सरपंच वाव्हळ यांनी दिली.
03136
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.