Raqesh Bapat’s Open Marriage Offer to Prajakta Shukre : सध्या बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये नवनवीन ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. घरात सध्या राखी सावंतची एन्ट्री झाल्यानं घरातील सदस्यांना धक्का बसला आहे. कारण घरात ड्रामा क्वीन राखी कोणत्याच सदस्याचं ऐकत नाहीय. घरात येताच तिने तन्वी कोलतेसोबत पंगा घेतलाय. घरात वेगवेगळे ट्वीस्ट रंगताना पहायला मिळताय.
घरात राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे, दिपाली सय्यद, करण सोनवणे, आयुष संजीव यांचा एक वेगळा ग्रुप झालेलं पहायला मिळतय. घरात डास्कसोबतच एकमेकांची केमिस्टी सुद्धा रंगताना पहायला मिळतेय. दरम्यान अशातच आता बिग बॉसच्या सोमवारच्या भागात राकेश बापट प्राजक्ता शुक्रेला थेट लग्नासाठी विचारताना पहायला मिळतोय.
बिग बॉसच्या सोमवारच्या भागात राकेश, प्राजक्ता आणि दिपाली डायनिंग टेबलवर खायला बसलेले असतात. त्यावेळी राकेश प्राजक्ताला म्हणतो की, 'लहानपणी माझ स्वप्न होतं की, मी कधी लग्न करेन तर एखाद्या सिंगरशी करेल. कारण जेव्हा मी झोपेतून उठेल तेव्हा ती, साडी घालून, केस मोकळे, तिने तानपुरा हातात घेतलाय आणि ती गातेय...' यावर पुन्हा राकेश प्राजक्ताला म्हणतो, 'मी तुला खुली ऑफर देतोय. माझ्याशी लग्न करशील.' यावर प्राजक्ता म्हणते की, 'चल, असं कुठं असतं का?' त्यावर राकेश तिला म्हणतो की, 'बघ मी तुला प्रपोज करतोय. लाजतेय का?'
View this post on Instagram
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)
दरम्यान ही क्लीप पाहून नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागली आहे. राकेशने प्राजक्ताला लग्नाची खरीखुरी मागणी घातली असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तर अनेकांनी 'खरंच दोघे एक झाले तर किती क्युट दिसतील' असं म्हटलय. तर काहींनी प्राजक्ताला 'हा राकेशचा गेम असल्याचा म्हणत' सल्ला दिलाय.
'Bigg Boss Marathi 6' च्या घरात एक्स पत्नीबद्दल पहिल्यांदाच बोलला राकेश बापट; म्हणतो, 'आम्ही दोघांनी...'Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.