वाशी : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, दसमेगाव ता.वाशी शिवारात सुरू असलेल्या अफूच्या बेकायदेशीर शेतीवर वाशी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.
या कारवाईत तब्बल ७२ लाख ८४ हजार ७५० रुपये किमतीची ४८५.६५ किलो वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी एका शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई बुधवार (ता.११) रोजी राञी उशीरा करण्यात आली.पोलीसाकडुण मिळालेल्या माहितीनुसार समाधान मनोहर उघडे यांनी दसमेगाव शिवारातील सर्हे क्रं.१६३ मधील शेतात कांद्याच्या पिकात आंतरपीक म्हणून अफूची लागवड केली होती.
या झाडांना पांढरी-गुलाबी रंगाची फुले आणि मोठी बोंडे आली होती.मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी घटनास्थळी छापा मारुण नायब तहसीलदार किसन सांगळे आणि दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी ही झाडे मुळासकट उपटून जप्त केली. एकूण ४८५.६५ किलो वजनाचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याची बाजारभावाप्रमाणे अंदाजे किंमत ७२ लाख ८४ हजार ७५० रुपये एवढी आहे.
Kalamb Crime News : पोलीस कारवाईत दोन आरोपी अटकेत; सोलापूर-धुळे हायवेवरील लूट प्रकरणाचा पर्दाफाशसहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोकर, मा.अप्पर पोलीस अधिक्षक शफकत आमना,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक विनोद ईज्जपवार,पोलीस निरिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक सुदर्शन कासार,सहाय्यक पोलीस निरिक्षक यशवंत घोडके , अंमलदार शौकत पठान , जावेद काझी , कपील बोरकर , दत्तात्रय राठोड,दयानंद गादेकर,गणेश खैरे , श्रीनिवास घुले , विकास जगताप, ज्योती बहीरवाल पो.नि अशोक ढगारे,सुभाष चौरे,नागनाथ गुरव, जगताप, मिसाळ, खैरे,घुले यांच्या संयुक्त पथकाने केली .
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.