नाशिक: मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर केलेल्या टीकेला महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘मी राज ठाकरे यांचा सन्मान करतो; मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्तच घाबरले आहेत.


मोदींना घाबरू नका. प्रभू श्रीराम सर्वांना समान होते, तसेच मोदीदेखील सर्वांसाठी समान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत तुम्ही उभे आहात; त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. घाबरायचं असेल तर चुकीच्या कामांना घाबरा,’ असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला.


नाशिक येथे खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या श्री. कोश्यारी यांनी बुधवारी (ता. ११) माध्यमांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली. काही दिवसांपूर्वी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाला ‘रटाळ’ असे संबोधले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना कोश्यारी म्हणाले, की कार्यक्रमाला उपस्थित असलेले लोक पंतप्रधानांना घाबरत नसतील; पण राज ठाकरे मात्र त्यांना जास्तच घाबरत आहेत.

परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इकबाल महापौर, तर काँग्रेसचा उपमहापौर

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाबाबत ‘अपघात नव्हे, तर घातपात’ असल्याचा आरोप केल्याबाबत विचारले असता कोश्यारी म्हणाले, की अजितदादा मोठे नेते होते. माझ्यावर अनेकदा टीका झाली, मला दूषणे देण्यात आली; पण दादांनी कधीही माझ्यावर टीका केली नाही. ते माझ्याविरोधात कधी बोलले नाहीत. त्यांना मी कधीच विसरणार नाही. रोहित पवार यांना घातपाताचा संशय वाटत असेल, तर त्यांनी सरकारकडे चौकशीची मागणी करावी, असाही सल्ला त्यांनी दिला.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.