[ad_1]

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत शनिवारी 14 फेब्रुवारीला साखळी फेरीत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. शनिवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात आयर्लंड विरुद्ध ओमान अशी लढत पाहायला मिळणार आहे. दिवसातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड स्कॉटलंड विरुद्ध खेळणार आहे. दिवसातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 2 अजिंक्य संघ आमनेसामने असणार आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चुरस असणार आहे. हा सामना जिंकणारा संघ सुपर 8 साठी पात्र ठरेल. या तिन्ही सामन्यांबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड

इंग्लंडचा हा तिसरा सामना असणार आहे. इंग्लंडला स्पर्धेत आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर स्कॉटलंड विरुद्ध विजय मिळवणं बंधनकारक आहे.

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ शनिवारी या मोहिमेतील आपला तिसरा सामना खेळणार आहेत. दोन्ही संघ आतापर्यंत अजिंक्य आहेत. दोन्ही संघांना सलग तिसरा सामना जिंकण्याची समसमान संधी आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ विजयी हॅट्रिक करण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.



[ad_2]

Source link

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.