अमरावती : गत खरीप हंगामात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर लागू झाल्यानंतरही पीकविम्याचा एकही रुपया अद्याप मिळालेला नाही. पीककापणी प्रयोगावर आधारित पीकविमा योजना लागू केल्याने शेतकऱ्यांना परताव्यासाठी केवळ एकच ट्रिगर लागू होणार आहे. जिल्हा कृषी विभागाने उत्पादनाची सरासरी कळविल्यानंतरही विमा परताव्यासाठी शब्दही निघत नसल्याने शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता बळावली आहे.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी जानेवारीतच परतावे मिळतील, अशी घोषणा केली होती. गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील चार लाख ८१ हजार ५०३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्याचा थेट फटका ५५ हजार २१३ शेतकऱ्यांना बसला होता. राज्यभरात ८५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याची दखल घेत राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना ३१ हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले होते. त्याचवेळी बाधित शेतकऱ्यांना पीकविमा योजनेतून हेक्टरी १८ हजार रुपये मिळतील, असेही यावेळी जाहीर करण्यात आले होते. ही मदत तत्काळ दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. जानेवारीपर्यंत ही मदत शेतकऱ्यांना मिळेल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनीही म्हटले होते.
Women Farmers Contribution: महिला शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल: २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषितप्रत्यक्षात या घोषणेला व नुकसानीला सहा महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. यंदा पीकविमा योजना बदलविण्यात आली आहे. एक रुपयात पीकविमा बंद करून शेतकऱ्यांकडून प्रीमियम आकारण्यात आला. जिल्ह्यातील ९८ हजार ६९८ शेतकऱ्यांनी या योजनेत नऊ कोटी तीन लाख रुपये प्रीमियम भरून सहभाग नोंदविला. त्यात राज्य सरकार व केंद्राने स्वतःचा समान २.१३ कोटी रुपयांचा हिस्सा विमा कंपनीला दिला आहे.
नुकसानभरपाईसाठी पीककापणी प्रयोग हा निकष निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी महसूल मंडळातील उत्पादन सरासरी पीककापणीच्या आधारे काढण्यात आली आहे. खरीप हंगामातील सोयाबीनची जिल्ह्यातील उत्पादकता ६४० किलो प्रति हेक्टर आली, तर मका २०९५ , मूग ३३७, उडीद ४०७ किलो प्रति हेक्टर आले आहे. सोयाबीनच्या उत्पादनाची सरासरी प्रति एकर २.५६ क्विंटल आली असून पीकविमा योजनेसाठी ती लागू आहे. कृषी विभागाकडून खरीप हंगामातील या पिकांची उत्पादन सरासरीची माहिती कळविण्यात आली असली तरी विमा कंपनीने त्याकडे दुर्लक्ष चालविले आहे. परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा एक रुपयाही मिळू शकलेला नाही.
Ambasan Farmers Protest : बिबट्याची दहशत आणि महावितरणची दिरंगाई; अंबासनचे शेतकरी सोमवारपासून 'अन्नत्याग' उपोषणावर!विमा कंपनीला उत्पादन सरासरी कळविल्यानंतर योजनेतील निकषानुसार (ट्रिगर) परतावा जाहीर होणे अपेक्षित होते. तथापि कंपनीने वेळकाढू धोरण अवलंबले असतानाच राज्य सरकारनेही त्याकडे डोळेझाक चालविल्याने शेतकऱ्यांच्या हिस्स्यावर एक रुपयाही आलेला नाही. त्यामुळे विमा कंपनी कुणाच्या भल्यासाठी आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
खरिपातील उत्पादनाची सरासरी (किलो-प्रति हेक्टरी)सोयाबीन : ५४०
मका : २०९५
मूग : ३३७
उडीद : ४०७
ज्वारी : ८२७
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.