अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील राहूवाडी तांडा येथे कोणीतरी अज्ञात चोरट्याने शुक्रवारी (ता.13) रात्री अकरा ते शनिवारी (ता.14) पहाटे पाच वाजेच्या दरम्यान येथील ग्रामस्थ राजेश सुरेश चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील पेटी ठेवलेले पत्नी, आई, भावजया व दोन मावश्या यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळुन एकुण 5 लाख 87 हजार 500 रुपयांवर कोणीतरी अज्ञात चोरट्याने डल्ला मारला आहे.


गेला माल: घरफोडी करुण चोरीला गेलेल्या सोन्याचे दागिणे व रोख रक्कम यामध्ये वडिगोद्री येथील सुनीता विठ्ठल राठोड यांचे वीस हजार रूपये किंमतीची चार ग्राम वजनाची नाकातील सोन्याची नथ,तीस हजार रूपये किंमतीचे 6 ग्राम कानातील सोन्याचे झुंबर, वलखेडा येथील अनिता राजू राठोड यांची 25 हजार रुपये किंमतीची पाच ग्राम वजनाची नाकातील सोन्याची नथ, साडे सात हजार रूपये किंमतीचे दीड ग्राम वजनाचे कानातील सोन्याचे फुल, चिंचखेड येथील द्वारकाबाई सुरेश चव्हाण यांची वीस हजार रुपये किंमतीची नाकातील सोन्याची नथ,पंचवीस हजार रूपये किंमतीचे कानातील पाच ग्राम सोन्याचे झुंबर, चिंचखेड येथील बबिता कृष्णा चव्हाण यांची वीस हजार रूपये किंमतीची चार ग्राम वजनाची सोन्याची नाकातील नथ, पन्नास हजार रूपये किंमतीची दहा ग्राम वजनाची 50मण्याची सोन्याची एकदानी,

ठाणे थोडक्यात बातम्या

पंचवीस हजार रूपये किंमतीची पाच ग्राम वजनी नाकातील सोन्याची वाकडी नथ, चिंचखेड तांडा येथिल राणी राजेश चव्हाण वीस हजार रूपये किंमतीची चार ग्राम वजनाची नाकातील सोन्याची नथ,तीस हजार रुपये किंमतीचे 6 ग्राम वजनाचे कानातील सोन्याचे झुंबर,पंचवीस हजार रूपये किंमतीची पाच ग्राम सोन्याची बारीक 40 मण्याची कांडी पोत, चाळीस हजार रूपये किंमतीची आठ ग्राम वजनाची सोन्याची 40 मण्याची एकदानी व रोख 2 लाख 50 हजार रूपये मिळुन एकुण 5 लाख 87 हजार 500 रुपयांची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली आहे.


राजेश चव्हाण यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात शनिवारी (ता.14) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रंजना बगलाने या करत आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.