पुणे : एका दुचाकीवरून तिघे जण प्रवास करणाऱ्यांवर (ट्रिपल सीट) वाहतूक पोलिसांनी चांगलाच कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी गेल्या पाच दिवसांत पोलिसांनी व्यापक कारवाई करत तब्बल ५ हजार ३८० दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली. १० ते १४ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या या धडक कारवाईत एक कोटी तीन लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

दंड भरावाच लागेल! सोलापुरातील १२,२६८ बेशिस्त वाहनचालकांवर खटले, ४३१८ बेशिस्त वाहनचालकांना वॉरंट अन् समन्स; दंड न भरल्यास पोलिस करणार कारवाई

शहर वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, वाहतूक कोंडीची ठिकाणे, सिग्नल परिसर तसेच अपघातप्रवण रस्त्यांवर ही विशेष तपासणी मोहीम राबवली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास केवळ दंडात्मक कारवाईच नव्हे, तर अपघाताच्या स्वरूपात जीवितहानीचा धोका वाढतो, असे नमूद करत पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.


ट्रीपल सीटसह इतर विविध प्रकारचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यासाठी प्रमुख रस्त्यांवर पथक तैनात करण्यात आली आहेत. वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.